ममता बॅनर्जींनी निवडणूक आयोगाला दाखविला ठेंगा, वीरेंद्र पुन्हा पोलिस महासंचालक


विशेष प्रतिनिधी

कोलकता : प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आपला आक्रमक पवित्रा दाखविण्यास सुरूवात केली आहे. वीरेंद यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून बदली करत निवडणूक आयोगाने त्यांच्याऐवजी पी. नीरजनारायण यांची नियुक्ती केली होती. बॅनर्जी यांनी वीरेंद्र यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नेमणूक केली आहे. Mammtadidi did police officers transfers

निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्यानंतर काही पोलिस व इतर अधिकाऱ्यांची बदली केली होती. बॅनर्जी यांनी त्यांना पुन्हा पूर्वीच्या पदावर नेमण्यास सुरुवात केली आहे.त्याचप्रमाणे, जावेद शमिन यांचीही पुन्हा अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक काळात बदली होणारे शमिन हे पहिले आयपीएस अधिकारी ठरले होते.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर पकड असल्याचे दाखविण्यासाठी ममता बॅनर्जींनी या दोघा आयपीएस अधिकाऱ्यांना आधीच्या पदावर नेमल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी एकूण २७ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली आहे.

Mammtadidi did police officers transfers

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण