हाडे गोठविणाऱ्या थंडीत झोजिला बोगद्याचे काम आहे सुरू, लेह-लडाख भारताशी कायमस्वरुपी जोडले जाणार


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : प्रचंड बर्फवृष्टी आणि हाडे गोठविणाºया थंडीत ी श्रीनगर ते लेह लडाख मार्गावर उभारण्यात येणाºया ‘झोजिला’ बोगद्याचं काम पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. झोजिला बोगद्यामुळे लेह-लडाखचा भाग उर्वरीत भारताशी बारामाही रस्ते मागार्ने जोडला जाणार आहे.Leh-Ladakh to be permanently connected to India

हा ‘सिल्क रूट’ भारतीय लष्करासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सोनमार्ग ते मीनामार्ग हा प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करण्यासाठी आता ४ तासांऐवजी केवळ ४० मिनिटे पुरेशी ठरणार आहेत. २,७०० मीटर ते ३,३०० मीटर उंचीवर स्थित या भागात किमान तापमान उणे ४० अंश इतके कमी असतं. त्यामुळे हा भाग ब?्याचदा बर्फाच्छादित असतो.



 

त्यामुळे या बोगद्याचं काम अतिशय आव्हानात्मक ठरतंय. या मार्गावर वाहणाºया नदी ओलांडण्यासाठी एकूण चार पूल बांधले जात असून, त्यांची एकूण लांबी ८१५ मीटर आहे.या प्रकल्पांतर्गत १७ किमी लांबीचा रस्ता, तीन उभ्या शाफ्ट, चार पूल आणि इतर संबंधित बांधकामं करण्यात येत आहेत.

पहिला बोगदा (निलगार बोगदा-क) ४६८ मीटर लांबीचा आहे तर दुसरा बोगदा (निलगार बोगदा-कक) १९७८ मीटर लांबीचा आहे. दोन्ही बोगदे ‘ट्विन ट्यूब टनेल’ आहेत. तिसरा बोगदा जो या प्रकल्पातील सर्वात मोठा आणि मुख्य भाग आहे तो झोजिला बोगदा आहे. या बोगद्याची लांबी १३ किमी आहे. हा बोगदा पश्चिमेकडील बालटालपासून सुरू होऊन पूर्वेकडील द्रासजवळ मीनामागार्ला जोडला जातोय. या प्रकल्पाचं काम २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

‘झोजिला पास’ नावानं ओळखल्या जाणा?्या हिमालयाच्या घाटातील या धोरणात्मक प्रकल्पामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख क्षेत्राच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. त्यातून व्यापार, पर्यटनालाही वाव मिळेल.

‘नॅशनल हायवेज अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेड’ (ठऌकऊउछ) कडून झोजिला बोगद्याच्या उभारणीची जबाबदारी ‘मेघा इंजिनिअरींग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या अभियांत्रिकी कंपनीकडे सोपवण्यात आलीय. तर बोगद्याच्या कामांवर देखरेखीचं काम आयआयटी दिल्ली आणि आयआयटी श्रीनगर या प्रमुख तांत्रिक शिक्षण संस्थांकडे सोपवण्यात आलंय.

Leh-Ladakh to be permanently connected to India

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात