कुमारमंगलम बिर्ला यांचा वोडाफोन – आयडिया कंपनीच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा, कंपनी वाचविण्यासाठी आपला २७ टक्के हिस्सा विकण्याची दर्शविली होती तयारी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या वोडाफोन-आयडया कंपनीला वाचविण्यासाठी स्वत:कडील २७ टक्के हिस्सा विक्री करण्याची तयारी दर्शविणाºया कुमार मंगलम बिर्ला यांनी वोडाफोन-आयडियाच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. बिर्ला यांचा राजीनामा संचालक मंडळाने मंजूर केल्याचे कंपनीने बुधवारी शेअर बाजाराला कळवले.Kumar Mangalam Birla resigns as Vodarfan-Idea chairman, ready to sell 27 per cent stake to save company

वोडाफोन-आयडीया सध्या प्रचंड आर्थिक संकाटात आहे. सातत्याने होणारा तोटा आणि एजीआर शुल्क थकबाकीची टांगती तलवार यामुळे भारतातील सेवा बंद करण्याचा मनस्थितीत कंपनी व्यवस्थापन आहे.



त्यातच कंपनीची सेवा अखंडित सुरु रहावी म्हणून स्वत:च्या हिश्श्याची विक्री करण्यास तयार झालेल्या अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी अचानक राजीनामा दिल्याने व्यवस्थापन अडचणीत सापडले आहे. बिर्ला यांच्या जागी बिगर कार्यकारी संचालक हिमांशु कपाडिया यांना हंगामी कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.

कंपनीवरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी कुमार मंगलम बिर्ला यांनी स्वत:ची २७ टक्के हिस्सेदारी विक्री करण्याची तयारी दर्शवली आहे. हिस्सा विक्रीला परवानगी दयावी, अशी मागणी बिर्ला यांनी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र तूर्त केंद्र सरकारने या मागणीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

वोडाफोन आयडियाची पालक कंपनी असलेल्या ब्रिटनमधील वोडाफोन ग्रुपनं देखील नव्याने गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे वोडाफोन-आयडीयाचे भवितव्य डळमळीत झाले आहे.वोडाफोन-आयडियाचे बाजार भांडवल जवळपास २४००० कोटी आहे.

मागील काही वर्षात दूरसंचार क्षेत्रात सेवा देणे कंपनीसाठी अवघड बनले आहे. याच स्पधेर्मुळे काही वर्षांपूर्वी वोडाफोन आणि आयडिया या दोन कंपन्या एकत्र आल्या होत्या. मात्र तरीही सातत्याने होणारा तोटा आणि एजीआर शुल्काचा वाढता डोंगर यामुळे वोडाफोन-आयडियाची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे.

Kumar Mangalam Birla resigns as Vodarfan-Idea chairman, ready to sell 27 per cent stake to save company

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात