किती असते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन?, काय सुविधा मिळतात?; जाणून घ्या महत्त्वाची माहिती


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनाविषयी फार कमी जणांना माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना वेतनाव्यतिरिक्त सरकारकडून अनेक सुविधा दिल्या जातात. सध्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रमणा यांना या सर्व सुविधा मिळतात. सरन्यायाधीशांव्यतिरिक्त सरकारकडून इतर न्यायाधीशांनाही अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. Know About salary of Supreme Court judges What other facilities provided

सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांना किती पगार मिळतो याशिवाय, इतर कोणत्या सुविधा त्यांना दिल्या जातात, याची माहिती आम्ही येथे दे आहोत.



सरन्यायाधीशांचे वेतन किती?

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना कायदा मंत्रालयाद्वारे वेतन दिले जाते. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना दरमहा 2.80 लाख रुपये दिले जातात. सरन्यायाधीशांव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयात असलेल्या इतर न्यायाधीशांचे वेतन दरमहा 2.50 लाख रुपये असते.

वेतनासह मिळतात या सुविधा

2.80 लाख रुपयांच्या वेतनाव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना अनेक सुविधा दिल्या जातात. त्यांना राहण्यासाठी सरकारकडून निवास व्यवस्था केली जाते. याव्यतिरिक्त CJIना सरकारकडून अनेक सुविधा दिल्या जातात, ज्यात कार, सुरक्षा कर्मचारी, कर्मचारी आणि त्यांच्या निवासस्थानासाठी विजेचा खर्च समाविष्ट आहे. या व्यतिरिक्त, सरन्यायाधीशांना 45,000 रुपये आतिथ्य भत्तादेखील दिला जातो.

या व्यतिरिक्त, जेव्हा सीजेआय निवृत्त होतात, तेव्हा त्यांना वार्षिक 16.80 लाख रुपये पेन्शनही दिले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती फक्त CJIच्या शिफारशीवर केली जाते.

Know About salary of Supreme Court judges What other facilities provided

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात