Corona Vaccination : कोरोनाविरुद्ध लसीकरणाचा देशात नवा विक्रम, एका दिवसात ९३ लाखांहून जास्त डोस दिले

India Makes New Record In Corona Vaccination today administers historic More than 93 lakh vaccines

New Record In Corona Vaccination  : कोरोना महामारीची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने लसींची उपलब्धता सुनिश्चित तर केली आहेच शिवाय वेगाने लसीकरणही केले जात आहे. शुक्रवारी एका दिवसात विक्रमी 93 लाखांहून जास्त कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची माहिती दिली. India Makes New Record In Corona Vaccination today administers historic More than 93 lakh vaccines


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने लसींची उपलब्धता सुनिश्चित तर केली आहेच शिवाय वेगाने लसीकरणही केले जात आहे. शुक्रवारी एका दिवसात विक्रमी 90 लाखांहून जास्त कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी स्वत: याची माहिती दिली.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरणाबद्दल ट्विट करताना म्हटले, “नागरिकांचे अभिनंदन, भारतात आतापर्यंत 90 लाखांहून अधिक लस डोस देण्यात आले आहेत. ऐतिहासिक.”

राज्यांमध्ये लसीचे 4.05 कोटींपेक्षा जास्त डोस

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, कोविडविरोधी लसीचे 4.05 कोटीहून अधिक डोस अजूनही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध आहेत. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 58.86 कोटींहून अधिक डोस लस देण्यात आले आहेत आणि त्यांना 17.64 लाखांहून अधिक डोस पोहोचवले जात आहेत.

मंत्रालयाने म्हटले की, लसीसाठी 4.05 कोटींपेक्षा जास्त न वापरलेले डोस अद्याप राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्र सरकार कोविड लसीकरणाच्या अभियानाला गती देण्यासाठी आणि देशभरात त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून नवनवीन लसींना आणि चाचण्यांना मंजुरी दिली जात आहे.

India Makes New Record In Corona Vaccination today administers historic More than 93 lakh vaccines

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात