वृत्तसंस्था
श्रीनगर: उत्तर काश्मीरमधील दुर्गम डोंगराच्या मध्यभागी असलेल्या वायनची गणना देशातील मागासलेल्या खेड्यांमध्ये केली जाते. परंतु कोरोना लसीकरणात ते आघाडीवर आहे. गावात 18 वर्षाच्या वरील व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे. लसीकरण झालेले हे देशातील पहिले गाव बनले आहे. याचे श्रेय जम्मू-काश्मीरच्या लसीकरणाच्या मॉडेलला जाते. या मॉडेलअंतर्गत, प्रशासनच गावकऱ्यांपर्यंत पोचले होते. Kashmir’s Wayan village tops in vaccination; The administration reached the village; Dosage given at home
लष्कर-ए-तैयबासारख्या दहशतवादी संघटनेचा गड मानल्या जाणाऱ्या बांदीपुरातील वायन या गावात जवळपास 99 टक्के लोकसंख्या गुर्जर-बकरवाल समुदायाची आहे. यापैकी बहुतेक भटके असून ते उन्हाळ्यात उंच पर्वतावर राहतात. दहशतवादामुळे खेड्यात विकासाचे वारे नाहीत. गावात इंटरनेट सुविधा, रस्ता, पिण्याचे पाणी नाही. आरोग्य सुविधांचा अभाव आहे.
नियंत्रण रेषेवरील जिल्हा बांदीपूर मुख्यालयापासून सुमारे २ कि.मी. अंतरावर वायन आहे. येथे प्रत्येक प्रौढ व्यक्तीला लस दिली आहे, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी बांदीपुर डॉ. बशीर अहमद खान म्हणाले. ते म्हणाले, गावात जाण्यासाठी लोकांना दररोज १ किमी चालत जावे लागते. हे गाव डोंगरावर वसलेले आहे. रस्ता फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे. पुढील 18 कि.मी. साठी पर्वत, नाले आणि जंगलांमधून जावे लागते. गावात एकूण 362 लोकांना लस दिली आहे.
लसीकरण मोहीम कशी राबविली
1) लसीकारण मोहीम 10 सुत्री कार्यक्रम 2) नागरी वस्तीपर्यत पोचण्याचे प्रशासनाचे प्रयत्न 3) बूथ स्तरावर लसीकरण 4)वैक्सीन ऑन व्हील्स का अभियान 5)लसीकारण स्थळी पोचण्यासाठी माइक्रो प्लानिंग केले. पोलिस, माध्यमांची मदत घेतली 6) जिल्हास्तरावर डॉक्टर, नर्सची पथके तयार केली 7) शिक्षक, बूथस्तरीय अधिकारी ग्रामसेवकांची मदत 8) सर्वाना लसीकरणासाठी प्रशिक्षण दिले 9) स्वेच्छा स्वयंसेवक यांना संधी दिली 10) विविध सरकारी अधिकाऱ्यांची मदत
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App