समाजाच्या तळागाळातून आलेले महान नेते : पंतप्रधान मोदींच्या भावना; माझे ज्येष्ठ बंधू गमावले; राजनाथसिंह यांचे भावपूर्ण उद्गार


वृत्तसंस्था

लखनऊ : अयोध्येतील राम मंदिर आंदोलनासाठी आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पणाला लावणारे ज्येष्ठ नेते कल्याण सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. Kalyan Singh Ji…statesman, veteran administrator, grassroots level leader & great human.

कल्याण सिंग यांच्या रूपाने देशाने तळागाळातून आलेला आलेले मोठे नेते आणि महान आत्मा गमावला आहे. उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि सर्वसामान्यांसाठी चा जिव्हाळा हे कायम लक्षात राहील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तर कल्याण सिंग यांच्या निधनाने मी माझे ज्येष्ठ बंधू आणि सहकारी गमावले आहेत, अशा भावना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केल्या. कल्याण सिंह यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि राजकीय कर्तृत्वाची छाप संपूर्ण देशावर आणि समाजावर पडली आहे. त्यांचे उत्तर प्रदेशातल्या विकासाचे योगदान अतुलनीय आहे, असे भावपूर्ण उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले.

कल्याण सिंग यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेश सरकारने तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्याचे जाहीर केले आहे. यांच्या पार्थिवावर 23 ऑगस्ट रोजी नरोरा येथे गंगा तीरावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे.

 

Kalyan Singh Ji…statesman, veteran administrator, grassroots level leader & great human.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात