कोरोना काळात दमदार कामगिरी करुनही शैलजा यांना वगळले का?


सलग दुसऱ्यांदा केरळ विधानसभेची निवडणूक सहज जिंकलेल्या मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी नव्या मंत्र्यांची निवड केली आहे. मात्र यातून त्यांनी गेल्या मंत्रीमंडळात आरोग्यमंत्री असणाऱ्या ज्येष्ठ नेत्या के. के. शैलजा यांना स्थान दिलेले नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तब्बल 60 हजारांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी झालेल्या शैलजा यांनी वगळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. K. Shailja dropped despite her strong performance during the Covid-19 pandemic, Kerala Chief Minister P Vijayan’s decision


वृत्तसंस्था

तिरुवअनंतपुरम : सलग दुसऱ्यांदा केरळमध्ये मंत्रीमंडळ तयार करत असलेल्या मुख्यमंत्री पी. विजयन यांनी मंगळवारी (दि. 18) जनतेला आणि पक्ष कार्यकर्त्यांना चांगलाच धक्का दिला. सीपीआय (मार्क्सवादी)च्या यापूर्वीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री म्हणून चमकदार कामगिरी केलेल्या के. शैलजा यांना नव्या मंत्रीमंडळात स्थान न देण्याचा निर्णय विजयन यांनी घेतला. शैलजा या साठ हजार एवढ्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

शैलजा यांना मंत्रीमंडळातून वगळल्याची बातमी सार्वजनिक होताच केरळमध्ये खळबळ उडाली. केरळमध्ये सत्तेत आलेल्या डाव्यांच्या विजयात शैलजा यांच्या मंत्रीमंडळाची कामगिरी मोलाची ठरली होती. कोरोना महामारीच्या साथीमध्ये के. शैलजा यांनी जी कामगिरी केली त्यामुळे डाव्यांना मिळालेल्या मतांमध्ये वाढ झाली होती. केरळमध्ये तळागाळापर्यंत आरोग्य व्यवस्था घेऊन जाण्याचे काम शैलजा यांनी केली. त्यामुळे विजयन यांच्यानंतर शैलजा याच उत्तराधिकारी होतील, असा त्यांच्या पक्षातील समर्थकांना वाटत होते. केरळातील सर्वसामान्य जनतेलाही आरोग्य खाते शैलजा यांच्याकडेच राहील असे वाटत होते.



विजयन यांनी हा अनाकलनीय निर्णय का घेतला याची कारणे आता शोधली जात आहेत. कोणत्याच मंत्र्यांना दुसऱ्यांदा संधी दिली जाणार नाही, असे सांगितले जाऊ लागले आहे. गेल्या खेपेस विजयन यांच्या मंत्रीमंडळात असलेल्या कोणत्याच मंत्र्यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी द्यायची नाही असा निर्णय पक्षानेच घेतला. याला अपवाद फक्त मुख्यमंत्री पी. विजयन यांचा करण्यात आला आहे. शैलजा यांच्या व्यतिरीक्त ए. सी. मोईद्दीन, एम. एम. मणी, टी. पी. रामकृष्णन आणि के. सुरेंद्र यांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळणार नसल्याचे सांगण्यात आले.

एकूणच केरळच्या सरकारमध्ये आणि सीपीआय (मार्क्सवादी) पक्षात देखील विजयन यांच्याच शब्दाला वजन असल्याचे यातून सिद्ध झाले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही दोनदा आमदार झालेल्या कार्यकर्त्यांना 2021 च्या निवडणुकीसाठी तिकीट न देण्याचा क्रांतीकारी निर्णय विजयन यांनी घेतला होता. या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री निवडणुकीपुर्वीच राजकीयदृष्ट्या बाद झाले होते. ज्येष्ठ मंत्री, बड्या आमदारांना तिकीट न दिल्याने पक्षाला फटका बसेल असे सांगितले गेले. मात्र विजयन स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिले. यांच्या या निर्णयाला केरळी जनतेनेही भरपूर मदतान करुन साथ दिल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

विजयन यांच्या या ठामपणातून पक्ष कार्यकर्त्यांना योग्य संदेश दिला गेल्याचे सांगितले जाते. मात्र त्याचवेळी जनतेच्या भावनांची डाव्यांना अजिबात कदर नसल्याचीही प्रतिमा यातून निर्माण झाली आहे. आरोग्यमंत्री म्हणून काम करत असताना शैलजा यांनी समाजातील सर्व स्तरात स्वतःची प्रतिमा निर्माण केली. त्यांच्या कर्त्तुत्त्वावर जनता समाधानी होती. त्यामुळेच आताही त्यांच्याकडेच आरोग्य मंत्रीपद जाईल या अपेक्षेत केरळी जनता होती. एवढेच नव्हे तर आणखीही एखादे महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे सूपूर्त केले जाईल असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र लोकभावनेकडे दुर्लक्ष करण्याचे धाडस मुख्यमंत्री विजयन यांनी केले.

मुख्यमंत्रीपदाची दुसरी टर्म सुरु करताना विजयन यांना दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या कोरोना महामारीचे आव्हान पेलावे लागणार आहे. शैलजा यांना घरी पाठवल्यानंतर आरोग्य विभागाच्या कामगिरीकडे सर्वांचेच डोळ्यात तेल घालून लक्ष असणार आहे. त्यामुळे नवा आरोग्यमंत्री आणण्याचा निर्णय चुकला नाही, हेदेखील विजयन यांना आता सिद्ध करावे लागेल.

K. Shailja dropped despite her strong performance during the Covid-19 pandemic, Kerala Chief Minister P Vijayan’s decision

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात