जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख चौधरींचे निधन; भारत जोडो यात्रेत राहुलजींसोबत चालताना हार्ट अटॅक


वृत्तसंस्था

चंढीगड : पंजाब मधील जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख चौधरी यांचे भारत जोडो यात्रेदरम्यान हार्ट अटॅक आल्याने निधन झाले आहे. सध्या भारत जोडो यात्रा फगवाडा मध्ये आहे. पण चौधरी यांच्या निधनामुळे यात्रा आजच्या दिवसापूर्वी स्थगित करण्यात आली आहे. Jalandhar Congress MP Santokh Chaudhary passed away

फगवाड्या नजीक भाटिया गावाजवळ भारत जो डो यात्रा असताना खासदार संतोख चौधरी हे खासदार राहुल गांधी यांच्याबरोबर चालत असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला. अचानक त्यांचा श्वास फुलायला लागला आणि ते रस्त्यावर कोसळले. त्यांना पोलिसांनी आणि राहुल गांधीं बरोबरच्या वैद्यकीय पथकाने ताबडतोब स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु संतोष चौधरी यांचे प्राण वाचू शकले नाहीत. संतोष चौधरी यांच्या निधनामुळे भारत जोडो यात्रा आजच्या दिवसापूर्वी स्थगित करण्यात आली आहे.

 काँग्रेसचे निष्ठावंत बडे नेता

संतोख चौधरी हे दोआबा मधले बड़े दलित नेता होते. काँग्रेसचे निष्ठावंत सैनिक होते. मोदी लाटेतही ते 2014 आणि 2019 मध्ये जालंदर मतदार संघातून लोकसभेवर निवडून आले होते. त्या आधी ते कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक सुरक्षा महिला बालकल्याण मंत्री होते. ते त्यावेळी फिल्लौर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. 2004 ते 2010 या कालावधीत ते पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते.

संतोख चौधरी यांना राजकीय घराण्याचा वारसा लाभला होता. पंजाबचे पहिले शिक्षणमंत्री गुरुबंता सिंह यांचे ते पुत्र होते. सध्या त्यांचे पुत्र विक्रमजीत सिंह चौधरी हे फिल्लौर मतदार संघातून आमदार आहेत.

2014 मध्ये मोदी लाटेत ते पहिल्यांदा जालंधर मतदार संघातून लोकसभेवर निवडून आले. त्यावेळी त्यांनी अकाली दलाच्या पवन कुमार टिनू यांचा पराभव केला होता. त्यावेळी अकाली दल आणि भाजप यांची युती होती परंतु चौधरी यांची लोकप्रियता त्यापेक्षा भारी ठरली होती. 2019 मध्ये देखील त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता.

Jalandhar Congress MP Santokh Chaudhary passed away

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात