लस घेऊनही क्वारंटाइन करण्याचा निर्णय, युनायटेड किंगडमचा निर्णय; शशी थरूर यांचा प्रखर विरोध


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतरही भारतीयांना युनायटेड किंग्डममध्ये गेल्यानंतर दहा दिवस क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते शशी थरूर संतप्त झाले असून तेथे होणाऱ्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असे त्यांनी सांगितले.Its offensive shashi tharoor pulls out of uk event over quarantine rules for indians

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना युनायटेड किंग्डममध्ये गेल्यानंतर क्वारंटाइन व्हावं लागणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. मात्र आपण हा असला अपमानास्पद प्रकार सहन करणार नाही, असे थरुर यांनी स्पष्ट करून कार्यक्रमास जाण्यास नकार दिला आहे.



थरुर यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली. ते म्हणाले, ” मी केंब्रिज युनियनच्या चर्चासत्रामधून नाव मागे घेतले आहे. तसेच मी युनायटेड किंग्डममधील माझ्या बॅटल ऑफ बिलाँगिंग (तिथे द स्ट्रगल फॉर इंडियाज सोल नावाने प्रकाशित) झालेल्या पुस्तक प्रकाशाच्या कार्यक्रमालाही जाणार नाही. पूर्णपणे लसीकरण झालेल्या भारतीयांना विलगीकरणामध्ये राहण्यास सांगणं हे आक्षेपार्ह (अपमानास्पद) आहे. ब्रिटीश यासंदर्भात फेरविचार करत आहेत,” असं थरुर यांनी म्हटल आहे.

युनायटेड किंग्डममध्ये भारतामधील कोव्हिशिल्ड लस घेणाऱ्यांना उड्डाणापूर्वी पीसीआर चाचणी आणि युकेमध्ये उतरल्यानंतर इतर चाचण्या बंधनकारक केल्या आहेत. त्याला त्यांनी विरोध केला आहे.युनायटेड किंग्डम सरकारने आफ्रिका, दक्षिण अमेरिका, युएई, भारत, तुर्की आणि इतर काही देशांमध्ये एखाद्या व्यक्तीने लसी घेतली असेल तरी त्याचं लसीकरण झालेलं नाही असे समजले जाईल, अशी घोषणा केली. अशा देशांमध्ये लस घेणाऱ्या व्यक्तींना युकेमध्ये गेल्यानंतर १० दिवस क्वारंटाइन रहावं लागणार असल्याचंही सरकारने म्हटलं आहे.

Its offensive shashi tharoor pulls out of uk event over quarantine rules for indians

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात