स्फोटक इस्त्रईलमध्ये भारतीय संशोधकांना मिळाला भुयारात आश्रय, ताज्या हल्ल्यात ४२ ठार


विशेष प्रतिनिधी

जेरुसलेम – इस्राईलने आज गाझा पट्टीवर आणखी जोरदार हवाई हल्ले करत हमासने तयार केलेली अनेक भुयारे नष्ट केली. तसेच, हमासच्या नऊ म्होरक्यांच्या घरांनाही लक्ष्य केले. इस्राईलने गाझा पट्टीत काल आणि आज केलेल्या हल्ल्यांमध्ये ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. Indian scientist safe in Istryal

दरम्यान हमासकडून होणाऱ्या रॉकेट हल्ल्यांमध्ये अडकलेल्या भारतीय संशोधकांच्या मदतीला येथील स्थानिक क्रिकेट क्लबने धाव घेत त्यांना वाचविले. हे सर्व संशोधक बेन गुरियन विद्यापीठात संशोधनकार्य करतात. ते सर्व जण नेगेव्ह या भागात गेल्या आठवडाभरापासून अडकून पडले होते. विराज भिंगारदिवे, हिना खांड, शशांक शेखर, रुद्रारु सेनगुप्ता आणि विष्णू खांड अशी या संशोधकांची नावे आहेत.



बेन गुरियन विद्यापीठाच्या जवळच बिरशेबा क्रिकेट क्लबची इमारत आहे. गाझा पट्टीतून हमासने अविरत रॉकेट हल्ले सुरु केल्याने अनेक स्थानिक नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. मात्र, भारतीय संशोधक गेले काही दिवसांपासून योग्य ठिकाणाचा शोध घेत होते. यावेळी क्लबने त्यांच्यासाठी आपले दरवाजे उघडले. या क्लबच्या इमारतीला एक तळघरही असल्याने रॉकेट हल्ल्यांपासून ते सुरक्षित आहे. ‘या संशोधकांपैकी काही जण आमच्या क्लबमध्ये खेळायला येत होते. त्यामुळे ते आमच्या कुटुंबाचाच भाग असल्याचे आम्ही समजतो,’ असे क्लबच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

Indian scientist safe in Istryal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात