लस घेतलेल्या भारतीयांनाही ब्रिटनमध्ये विलगीकरणात रहावे लागणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – ब्रिटनने प्रवासादर्भात नव्याने मार्गदर्शन सूचना जारी केल्या असून त्यानुसार आफ्रिकी आणि दक्षिण अमेरिकी देशात लस घेतलेल्या नागरिकांना ब्रिटनमध्ये आल्यानंतर दहा दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक केले आहे.Indian must face strict rules in Briton

त्याचबरोबर आरटीपीसीआर चाचणी देखली अनिवार्य आहे. या देशात भारत, रशिया, सौदी अरेबिया, तुर्कस्तान, जॉर्डन यांचाही समावेश आहे.ब्रिटनच्या नव्या प्रवासी धोरणानुसार काही देशात ब्रिटनची लस घेतलेल्या नागरिकांना देखील लस न घेतलेल्या लोकांचा सामील करण्यात आले आहे



आणि त्यांना ब्रिटनने निश्चि त केलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. या धोरणावर राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी टीका केली आहे. या निर्णयाला वर्णद्वेषाचा वास येत असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे.

ब्रिटनची फायजर, ॲस्ट्राझेनिका किंवा मॉडर्नाची लस ज्या देशात दिली जात आहे, त्या देशांतील नागरिकांना देखील सवलत देण्यास ब्रिटनने नकार दिला आहे. ब्रिटनचे नवे प्रवास धोरण हे किचकट असून त्यामुळे अनेक देश नाराज झाले आहेत.

Indian must face strict rules in Briton

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात