लसीकरण मोहीम युध्दपातळीवर राबवा, लोकांना प्रोत्साहित करा, पंतप्रधानांचे मंत्र्यांना आवाहन

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण मोहीम युध्दपातळीवर राबवा. कोरोना नियमावलीचे पालन करा आणि त्याचे उदाहरण घालून द्या. लोकांना सर्व पातळ्यांवर प्रोत्साहित करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्र्यांची आभासी बैठक घेतली. कॅबीनेट आणि राज्य मंत्रीही या बैठकीस उपस्थित होते.Implement vaccination campaign on war footing, encourage people, PM appeals to ministers

पंतप्रधान म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट येणारच नाही असे वातावरण आपण तयार करायला हवे. ही जबाबदारी मंत्र्यांनी घ्यायला हवी. कोरोनाच्या तिसºया लाटेला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्याचे आवाहन करताना ते म्हणाले यासाठी शिलान्यासापासून ते उद्घाटनापर्यंत सर्व पातळ्यांवर काम करायला हवे.



पंतप्रधान म्हणाले, कोरोनाची लाट अद्याप ओसरलेली नाही. त्यामुळे कोरोना नियमावलीचे पालन करावेच लागेल. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होता प्रत्येकाने मास्क परिधान केलाच पाहिजे.निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेणारे प्रेझेंटेशन सादर केले.

यावेळी पंतप्रधानांनी देशातील शास्त्रज्ञांचे कौतुक केले. त्याचबरोबर कोरोनाविरुध्दची लढाई लढताना सरकारने केलेल्या प्रयत्न सांगत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबविण्यासाठी अभिनंदन केले.
भारताला कोरोनाच्या एका नव्हे तर दोन लाटांचा सामना करावा लागला.

त्यामुळे आण अजूनही मास्क परिधान करणे शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना पक्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र, हा वेग आपण कायम ठेवायला हवा. कोरोनाबाबतचे सगळे संभ्रम दूर करायला हवेत.

या वर्षाच्या अखेरीपर्यंत देशातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीचे लसीकरण पूर्ण व्हायला हवे. यासाठी प्रत्येक माणसाचे लसीकरण महत्वाचे आहे. त्याचबरोबर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांवर (कंटेंमेंट झोन) लक्ष ठेवायला हवे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ते अत्यंत महत्वाचे आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

Implement vaccination campaign on war footing, encourage people, PM appeals to ministers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात