लसीकरण पूर्ण झाले असल्यास करू शकता स्वित्झर्लंडची सैर, क्वारंटाईनही होण्याची गरज नसल्याचे स्विस सरकारतर्फे स्पष्ट


विशेष प्रतिनिधी

झुरिच : भारतीय लस कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड यांना मान्यता दिली नसल्याने युरोपीय युनियनमधील देशांमध्ये भारतीयांना प्रवेश नाही. मात्र, स्वित्झर्लंड देशाने भारतीयांसाठी दरवाजे उघडले आहेत. त्यासाठी पूर्ण लसीकरणाची म्हणजे दोन्ही डोस पूर्ण झाल्याची अट मात्र ठेवली आहे. कोव्हिशिल्ड लस या देशात चालणार आहे.Visit to Switzerland if vaccination is complete, no need to be quarantined

स्विस सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की कोरोनाबाबत हाय रिस्क असलेल्या देशांतील पर्यटकांना काही अटींवर प्रवेश देण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना तसेच कोरोनातून बरे झालेल्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.



त्यांची कोणतीही चाचणी केली जाणार नाही किंवा क्वारंटाईनही केले जाणार नाही. मात्र, ज्यांना कोरोना होऊन गेलेला नाही किंवा ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना आरटीपीसीआर चाचणी करून घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत त्यांना क्वारंटाईन होणेही गरजेचे आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये सापडलेला कोरोनाचा नवीन डेल्टा व्हेरिएंट आरटीपीसीआर चाचणीमध्येही सापडत नाही. त्याचबरोबर स्वित्झर्लंडमध्ये वापरण्यात येत असलेली लस ही डेल्टा व्हेरिएंटवरही प्रभाी असल्याने सुरक्षित मानली जाते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Visit to Switzerland if vaccination is complete, no need to be quarantined

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात