Hijab Controversy: ‘बिकिनी असो किंवा हिजाब ही महिलांची पसंती, प्रियांका गांधींचे वक्तव्य, भाजपचा मलालाला विरोध


मलाला युसुफझाईनंतर आता कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही उडी घेतली आहे. प्रियांका गांधींच्या या वक्तव्यामुळे हा वाद आणखी पेटू शकतो. प्रियांका गांधी यांनी बुधवारी सांगितले की, महिलांनी बिकिनी घालायची की हिजाब हा त्यांचा निर्णय आहे, मला याप्रकरणी कोणालाही सल्ला देण्याचा अधिकार नाही.” Hijab Controversy Whether it is bikini or hijab, women’s choice, Priyanka Gandhi’s statement, BJP opposes Malala


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मलाला युसुफझाईनंतर आता कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही उडी घेतली आहे. प्रियांका गांधींच्या या वक्तव्यामुळे हा वाद आणखी पेटू शकतो. प्रियांका गांधी यांनी बुधवारी सांगितले की, महिलांनी बिकिनी घालायची की हिजाब हा त्यांचा निर्णय आहे, मला याप्रकरणी कोणालाही सल्ला देण्याचा अधिकार नाही.”

कर्नाटकातील उडुपी कॉलेजपासून सुरू झालेला हिजाबचा वाद आता वेगाने पसरत आहे. याबाबत देश-विदेशातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दुसरीकडे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी एक बैठक बोलावली असून, त्यात हिजाब वादावर विचार केला जाणार आहे. राज्यात तीन दिवस शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

प्रियांका गांधी यांचे ट्विट

प्रियांका गांधी यांनी ट्विट करून लिहिले की, ‘बिकिनी घालावी, घूंघट घालावा, जीन्स घालावी किंवा हिजाब घालावा, हा महिलांचा अधिकार आहे की, त्यांनी काय घालावे आणि हा अधिकार भारतीय राज्यघटनेने त्यांना मिळाला आहे. भारतीय राज्यघटना त्यांना काहीही परिधान करण्याचे स्वातंत्र्य देते. त्यामुळे महिलांचा छळ करणे थांबवा.”

मलालाने केले आवाहन, तालिबानने दिली प्रतिक्रिया

नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मलालाने महिलांना अभ्यासापासून वंचित ठेवू नका, असे आवाहन केले आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबाननेही यावर आपले मत व्यक्त केले आहे. तालिबानचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानातील महिलांना बुरख्यातच राहावे लागेल.

मलालाच्या वक्तव्याला भाजप नेते रवी यांचा विरोध

दरम्यान, नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझाईच्या वक्तव्याला कर्नाटक भाजप नेते सीटी रवी यांनी कडाडून विरोध केला आहे. मलाला भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये कशी बोलू शकते असा सवाल त्यांनी केला.

भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय म्हणतात की, कुराणचा पहिला शब्द इकरा आहे, ज्याचा अर्थ अभ्यास आहे, परंतु कर्नाटकात आपण जे पाहतोय ते ज्ञानाचा शोध नाही. हे शिक्षण सोडून सर्व काही आहे. धर्माच्या नावाखाली मुलींना शिक्षणाऐवजी हिजाब निवडण्यास सांगितले जात आहे.”

Hijab Controversy Whether it is bikini or hijab, women’s choice, Priyanka Gandhi’s statement, BJP opposes Malala

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात