कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून महाराष्ट्राचे गृहमंत्री चिंतेत, धार्मिक कटुता निर्माण होईल असे वक्तव्य न करण्याचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

मुंबई: कर्नाटकातील एका शाळेत हिजाब घालण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील चिंतेत आहेत. धार्मिक कटुता निर्माण होईल असे वक्तव्य करू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.Maharashtra Home Minister Concerned Over Karnataka Hijab Case, Appeal not to make statements that would create religious bitterness

हिजाब प्रकरणी कर्नाटकात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कर्नाटकातील प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटल्याचे स्पष्ट होताच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गृह विभागातील अधिकाºयांना काही सूचना केल्या आहेत.



गृहमंत्री वळसे पाटील यांनी ट्विट करत जनतेला ही विनंती केली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, ‘कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून सुरू असलेला गदारोळ दु्दैर्वी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत. कर्नाटक हायकोर्टात याबाबत सुनावणी सुरू आहे.

माझी महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांतील जनतेला विनंती आहे की, या विषयाला फार महत्त्व देऊ नये. तसेच धार्मिक कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य किंवा कृती कुणीही करू नये.’कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद बीडमध्ये उमटले असून येथे फारूखी लुकमान नावाच्या विद्यार्थी नेत्याने एक बॅनर लावले आहे. ‘पहले हिजाब, फिर किताब.. हर किमती चीज पर्दे में होती है’, असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे.

Maharashtra Home Minister Concerned Over Karnataka Hijab Case, Appeal not to make statements that would create religious bitterness

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात