लाच घेतल्याचे निर्लज्ज समर्थन, म्हणे मंदिरात कोणी प्रसाद घेऊन आले असेल तर नाही कसं म्हणणार


विशेष प्रतिनिधी

जयपूर : लाच घेण्याचा रोग देशात गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र, त्याचे निर्लज्जपणे समर्थन करण्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे. जयपूरमध्ये संपूर्ण कार्यालयच लाच घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचे निर्लज्ज समर्थन करताना कार्यालयाच्या उपायुक्त महिला अधिकारी म्हणाल्या, जेव्हा मंदिरात कोणी प्रसाद घेऊन आलं असेल तर नाही कसं म्हणणार?Shameless self-promotion for taking bribe

जयपूर शहराच्या विकासासाठी स्थापन झालेल्या जयपूर विकास प्राधिकरणाच्या उपायुक्त यांच्यासहित संपूर्ण कार्यालय लाचखोरीच्या प्रकरणात पकडण्यात आले. लाच घेताना पकडल्यानंतर राज्य प्रशासकीय सेवेच्या अधिकारी ममता यादव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हसत होत्या. जर कोणी मंदिरात प्रसाद घेऊन आलं असेल तर त्याला नाही कसं म्हणायचं अशी विचारणा त्या करत होत्या.



लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका व्यक्तीने जमिनीच्या व्यवहारासाठी उपायुक्त सहा लाख आणि कनिष्ठ अभियंता तीन लाख रुपये मागत असल्याची तक्रार केली होती. यानंतर अधिकाऱ्यांनी जाळं टाकले आणि ममता यादव यांच्यासोबत कार्यालयातील सर्वांनाच लाच घेताना रंगेहाथ पकडलं.

Shameless self-promotion for taking bribe

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात