विशेष प्रतिनिधी
लखनऊ : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेत समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला. या निवडणुकीत सपाला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा करत बॅनर्जी यांनी उपस्थित सपा कार्यकर्त्यांकडे फुटबॉल भिरकावात खेला होबे अशी घोषणा दिली.Mamata Banerjee throws football to Samajwadi Party workers, announces Khela Hobe in Uttar Pradesh too
बॅनर्जी म्हणाल्या, उत्तर प्रदेशमध्ये एनआरसीच्या वेळी एन्काऊंटरच्या नावावर किती लोकांना मारण्यात आलं हे आम्ही पाहिले. खोट्या चकमकींमध्ये लोकांना मारण्याची गरज काय? कायद्याप्रमाणे काम करायला हवे. भाजपाने इतिहास बदलण्याचं काम केलं. भाजपाने शहीद ज्योत नष्ट करण्याचं काम केलं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाशी खेळ सुरू आहे.
आमचे शेतकरी आंदोलन करत होते आणि भाजपाच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकºयांना गाडीखाली चिरडून मारलं. यासाठी भाजपाने माफी मागितली पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये करोनामुळे लोक मरत होते तेव्हा योगी कोठे गेले होते? त्यांनी मृत लोकांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे. लोकांना मृतदेह गंगा नदीत सोडण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली. यासाठी जनतेची माफी मागा, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली.
त्या म्हणाल्या, मोदी म्हणतात आम्ही यूपीला पैसे दिले, तुम्ही स्वत:च्या खिशातून पैसे दिले का? हे सर्व पैसे राज्यांकडून मिळतात. ते जनतेचे पैसे आहेत. आज सकाळी ब्राह्मण समाजाचे लोक मला भेटायला आले होते. त्यांनी मी आल्यानंतर अखिलेश यादव यांना पूर्ण पाठिंबा देणार असल्याचं म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more