उत्तर प्रदेशात पावसाचे रौद्ररुप, महापुराचा तब्बल पाच लाख लोकांना फटका


विशेष प्रतिनिधी

लखनौ – उत्तर प्रदेशात पुराने हलकल्लोळ माजवला आहे. उत्तर प्रदेशात काल दिवसभरात सरासरीपेक्षा १५४ टक्के अधिक, म्हणजे १३.१ मिमी पाऊस पडला. बाराशेहून अधिक गावांमधील पाच लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.Heavy rain in UP, lot of villages submerged in Flood

पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदत आणि बचावासाठी बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रयागराज, चित्रकूट, कौसंबी, प्रतापगड, बस्ती, गोंडा, सुल्तानपूर, श्रावस्ती, लखनौ, रायबरेली आणि फतेहपूरसह ११ जिल्ह्यांमध्ये काल दिवसभरात २५ मिमीपेक्षा अधिक पाऊस कोसळला. एकूण २३ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.



बदायूँ, प्रयागराज, मिर्झापूर, वाराणसी, बलिया आणि गाझीपूर या जिल्ह्यांमध्ये गंगेने पातळी ओलांडली आहे, तर औरारिया, हमीरपूर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये यमुनेने विक्राळ रुप धारण केले आहे. याशिवाय, बेटवा, शारदा आणि कुनो या नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे.

या सर्व ठिकाणी मदतकार्याला वेग आला आहे. पूरग्रस्त भागांमध्ये आतापर्यंत २१ हजार रेशन किट आणि दीड लाख लाखांहून अधिक जेवणाची पाकिटे वाटण्यात आली आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल यांच्यासह इतर काही बचाव दलांची एकूण ५९ पथके मदतकार्य करत आहेत.राज्य सरकारने येथील मदत आणि बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली असली तरीसुद्धा प्रतिकूल हवामानामुळे ते आज घटनास्थळी पोचू शकले नाही.

Heavy rain in UP, lot of villages submerged in Flood

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात