ट्विटरला दिल्ली हायकोर्टाने पुन्हा फटकारले, नियमांचे पालन करण्याचे आदेश


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नव्या माहिती तंत्रज्ञानविषयक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ट्विटर या मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मला दिल्ली उच्च न्यायालयाने धारेवर धरले. ट्विटरने माहिती तंत्रज्ञानविषयक नियमांचे पालन केले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. HC once again targets twitter

मुख्य तक्रारनिवारण अधिकारी म्हणून व्यवस्थापनातील एखादा उच्चपदस्थ अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे अपेक्षित आहे, असे न्या. रेखा पल्ली यांनी म्हटले आहे. ट्विटरने या अनुषंगाने न्यायालयात शपथपत्र सादर केले असून त्यात कंत्राटदाराच्या माध्यमातून निवड करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यालाच मुख्य तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमल्याची माहिती दिली होती.



या पदावर तुम्ही नियुक्त केलेली व्यक्ती ही निःसंशयपणे तुमचा कर्मचारी नाही. नियमांना तुम्ही फारसे गंभीरपणे घेत नसल्याचे दिसते. नियमांचे पण एक पावित्र्य असते, असेही न्यायालयाने यावेळी ट्विटरला सुनावले.

ट्विटरचे शपथपत्र स्वीकारण्यास देखील न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार देत तुम्हाला नियमांचे पालन करावेच लागेल असे बजावले. न्यायालयाच्या या आदेशांनंतर आता ट्विटरला नव्याने शपथपत्र सादर करावे लागेल. ट्विटरने आता कंत्राटदाराचे नाव सांगावे तसेच कंत्राटाचे स्वरूप देखील स्पष्ट करावे असे न्यायालयाने सांगत त्यासाठी आठवडाभराचा वेळ दिला आहे.

HC once again targets twitter

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात