Gorkhpur Temple Attack : कोण आहे गोरखपूर मंदिरावर हल्ला करणारा तरुण? IIT बॉम्बेमधून इंजिनिअरिंग, रिलायन्स-एस्सारमध्ये केली नोकरी, वाचा सविस्तर…


गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिराच्या सुरक्षेवर तैनात असलेल्या जवानांवर हल्ला केल्याचा आरोप ज्या तरुणावर आहे, त्या अहमद मुर्तझा अब्बासीबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, अहमद मुर्तझा अब्बासी याच्याशी संबंधित बरीचशी माहिती आता समोर आली आहे. आरोपी अहमद मुर्तझा अब्बासी हा गोरखपूरच्या सिव्हिल लाइन भागातील रहिवासी आहे.Gorkhpur Temple Attack: Who is the young man who attacked Gorakhpur temple? Engineering from IIT Bombay, job in Reliance-Essar, read more


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिराच्या सुरक्षेवर तैनात असलेल्या जवानांवर हल्ला केल्याचा आरोप ज्या तरुणावर आहे, त्या अहमद मुर्तझा अब्बासीबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, अहमद मुर्तझा अब्बासी याच्याशी संबंधित बरीचशी माहिती आता समोर आली आहे. आरोपी अहमद मुर्तझा अब्बासी हा गोरखपूरच्या सिव्हिल लाइन भागातील रहिवासी आहे.

आयआयटीचा पदवीधर

अहमद मुर्तझा अब्बासी याने 2015 मध्ये आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. पदवी पूर्ण केल्यानंतर त्याने दोन मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. 2015 मध्ये अभियांत्रिकी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आणि नंतर एस्सार पेट्रोकेमिकल्समध्ये नोकरी केली. 2017 पासून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.



मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती

अहमद मुर्तझा अब्बासी याच्यावर अनेक डॉक्टरांनी उपचार केले आहेत. तो मुंबईत राहत होता. अहमद मुर्तझा अब्बासी याच्यासाठी गेल्या काही वर्षांपासून मित्रांच्या भेटीगाठीही कमी झाल्या आहेत. अब्बासीचे वडील मोहम्मद मुनीर हे अनेक फायनान्स कंपन्यांचे कायदेशीर सल्लागार होते. अब्बासीचे काका गोरखपूरचे मोठे डॉक्टर आहेत. ते अब्बासी हॉस्पिटलचे मालक आहेत.

आरोपी मुर्तझा अब्बासीचे एक लग्न बोलणी करताना मोडले. नंतर दुसऱ्या मुलीशी लग्न केले, पण तीही सोडून निघून गेली. आरोपी अब्बासी याच्यावर अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंतच्या चौकशीत अब्बासी हा यूट्यूबच्या माध्यमातून कट्टरपंथी झाल्याचे काही क्लू मिळाले आहेत.

सीसीटीव्ही फुटेजही समोर

दरम्यान, अब्बासी याच्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो पोलिसांवर हल्ला करताना दिसत आहे. गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिराच्या गेटवर सुरक्षा कर्मचार्‍यांवर हल्ला करून पळून गेलेल्या मुर्तझा अब्बासीला लोकांनी पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा दिल्या.

मंदिराच्या गेटवर खेळण्यांचे दुकान लावणारे जवाहरलाल म्हणाले, ‘मुर्तझा अब्बासीने पोलिसांना जखमी करताच मुख्य गेट बंद करण्यात आले. अब्बासी मंदिराकडे धावू लागला आणि दगडफेक करू लागला. स्थानिक लोकांनी दगडफेक केल्याने अब्बासी याच्या हातातील धारदार शस्त्र निसटले, तेव्हा तो नियंत्रणात आला, मात्र यावेळी तो सारख्या अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा देत होता.

Gorkhpur Temple Attack: Who is the young man who attacked Gorakhpur temple? Engineering from IIT Bombay, job in Reliance-Essar, read more

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात