देशातील १६ राज्यात कोरोनाची मोफत लस, संसर्ग रोखण्यासाठी १ मे पासून लसीकरण


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील 16 राज्यांनी आपल्या रहिवाशांना कोरोनाविरोधी लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. देशात कोरोनामुळे 1 लाख 89 हजार 544 जण बळी पडले असून 1कोटी 60 लाख जण बाधित आहेत. Free corona vaccine in 16 states of the country, vaccination from May 1 to prevent infectionकेंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाविरोधी लस देण्याचे जाहीर केले आहे. 1 मे पासून लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. त्या द्वारे कोरोनाचे संक्रमण तोडण्यात यश मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी 18 ते 45 वयोगटातील लोकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, भारतातील लस निर्मिती कंपनी सीरमने राज्यांसाठी लस 400 रुपये तर खासगी हॉस्पिटलना 600 रुपये एवढा दर निश्चित केला आहे. दुसरीकडे भारत बायोटेक कंपनीने राज्यांसाठी 600 रुपये आणि खासगी रुग्णालयांना 1200 रुपये दर जाहीर केला आहे. दोन्ही कंपन्यांनी केंद्र सरकारला लस मात्र, 150 रुपयांना देण्याचे जाहीर केले आहे.

मोफत लस देणारी राज्ये

मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचलप्रदेश, गोवा, केरळ, छत्तीसगड, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, सिक्कीम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि हरियाणा.

Free corona vaccine in 16 states of the country, vaccination from May 1 to prevent infection

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती