माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली ; एम्समध्ये केले दाखल

डॉ.मनमोहन सिंग श्वास घेण्यास त्रास होत होता आणि सतत छातीत दाब येत होता.Former PM Dr. Manmohan Singh’s health deteriorated, he was admitted to AIIMS


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची आज( बुधवारी ) प्रकृती बिघडली.त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) कार्डिओ टॉवरवर नेण्यात आले आहे. डॉ.नितीश नायक यांच्या टीमच्या देखरेखीखाली डॉ.मनमोहन सिंग यांना दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ.मनमोहन सिंग श्वास घेण्यास त्रास होत होता आणि सतत छातीत दाब येत होता . डॉ.मनमोहन सिंग यांच्या तपासासाठी एक वैद्यकीय गट बनवला आहे, ज्याचे नेतृत्व एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया करणार आहेत. गेल्या महिन्यात २६ सप्टेंबरला मनमोहन सिंग ८९ वर्षांचे झाले.या वर्षी एप्रिलमध्ये मनमोहन सिंग यांनाही कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांना एम्समध्ये काही दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. माजी पंतप्रधानांनी ४ मार्च आणि ३ एप्रिल रोजी कोरोना लसीचे दोन डोस घेतले. गेल्या वर्षी, मनमोहन सिंग यांना एका नवीन औषधामुळे रिएक्शन आणि ताप आल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. कित्येक दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Former PM Dr. Manmohan Singh’s health deteriorated, he was admitted to AIIMS

महत्त्वाच्या बातम्या