DURGA SANMAN AWARD : अभिनय सम्राट प्रशांत दामलेंच्या हस्ते ‘द फोकस इंडिया’चा पहिला दुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा ! पहा व्हिडिओ…

  • औरंगाबाद येथे द फोकस इंडियाचा पहिला ‘दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न झाला.

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : स्त्रीशक्तीचा जागर आणि सन्मान करत…द फोकस इंडियाने ‘ती’च्या लढ्याला केलेला मानाचा मुजरा म्हणजेच ‘दुर्गा सन्मान’पुरस्कार..हा दुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न झाला.हा पुरस्कार नाट्य क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व अभिनेते निर्माते प्रशांत दामले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.DURGA SANMAN AWARD: The first Durga Sanman Award Ceremony of ‘The Focus India’ at the hands of Acting Emperor Prashant Damle! Watch the video …

द फोकस इंडियाच्यावतीने देण्यात येणारा हा पहिला दुर्गा सन्मान पुरस्कार स्त्री सक्षमीकरणाचे उज्ज्वल कार्य करणाऱ्या प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. उज्ज्वला दहिफळे, ख्यातनाम वकील कल्पलता पाटील- भारस्वाडकर आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंटच्या वरिष्ठ अधिकारी वैशाली केनेकर यांना प्रदान करण्यात आला .

द फोकस इंडियाच्या दुर्गा सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात अभिनय सम्राट प्रशांत दामले यांच्या सुरांचा साज चढला .प्रशांत दामलेंसोबत ‘गप्पा-टप्पा’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात त्यांनी ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं…त्याबरोबरच रंजिश ही सही ही गझल गात प्रेक्षकांना सुखद धक्का दिला….

औरंगाबादेतील अँबॅसेडर अजंठा हॉटेलमध्ये (रविवार) दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता संपन्न झाला .

यावेळी द फोकस इंडियाच्या वतीने करण्यात आलेल्या विनंतीला मान देत प्रशांत दामले यांच्या सुरांनी उपस्थित सर्व मंत्रमुग्ध झाले. प्रायोजक लालचंद मंगलदास सोनी LMS ज्वेलर्स औरंगाबाद तर सहप्रायोजक कापसे पैठणी येवला यांच्या सहकार्याने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या सोहळ्याचे सूत्रसंचालन माधवी अग्रवाल यांनी केले तर प्रेषित रूद्रवार यांनी प्रशांत दामले यांची मुलाखत घेतली.

DURGA SANMAN AWARD: The first Durga Sanman Award Ceremony of ‘The Focus India’ at the hands of Acting Emperor Prashant Damle! Watch the video