पश्चिसम बंगालमध्ये संततदाऱ, महापुराने तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविले


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. मध्य प्रदेशपाठोपाठ प. बंगालही आता महापुराने वेढला गेला आहे. Flood situation worsen in west Bengal

गेल्या काही दिवसांपासून राज्यात संततधार पाऊस सुरू आहे. पुरामुळे आतापर्यंत सुमारे तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (डीव्हीसी) धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने पूर्व वर्धमान, पश्चिम वर्धमान, पश्चिम मेदिनीपूर, हुगळी, हावडा आणि दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांमधील प्रमुख भाग पाण्याखाली गेला आहे.



बंगालमध्ये पुरामुळे आतापर्यंत १५ जणांनी जीव गमावला आहे. तर तीन लाख जणांचे स्थलांतर करावे लागले आहे. काही जणांचा विजेच्या धक्क्याने, साप चावल्याने आणि भिंती कोसळल्याने मृत्यू झाला. पुराचा फटका बसलेल्या सहा जिल्ह्यांमधील लोकांना कंबरेपर्यंत पाण्यातून वाट काढावी लागत आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नी ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरून संवाद साधत पूरस्थितीची माहिती घेतली असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लागेल ती सर्व मदत केंद्राकडून दिली जाईल असे आश्वासन मोदींनी दिल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.

Flood situation worsen in west Bengal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात