फेसबुकचे सर्वांवर लक्ष आहे असे म्हणतात. पण फेसबुकचा निर्माता आणि अध्यक्ष मार्क झुकरबर्ग याच्या सुरक्षेसाठी फेसबुकला १७१ कोटी रुपये (२३ मिलीयन डॉलर्स) खर्च करावा लागला. झुकरबर्गच्या निवासस्थानातील आणि कार्यालयातील सुरक्षेसाठी हा खर्च आला आहे.Facebook spends Rs 171 crore a year on Mark Zuckerberg’s security
विशेष प्रतिनिधी
सॅन फ्रान्सिस्को : फेसबुकचे सर्वांवर लक्ष आहे असे म्हणतात. पण फेसबुकचा निर्माता आणि अध्यक्ष मार्क झुकरबर्ग याच्या सुरक्षेसाठी फेसबुकला १७१ कोटी रुपये (२३ मिलीयन डॉलर्स) खर्च करावा लागला. झुकरबर्गच्या निवासस्थानातील आणि कार्यालयातील सुरक्षेसाठी हा खर्च आला आहे.
जगातील सर्वांत मोठी सोशल नेटवर्किंग साइट असलेल्या फेसबुकचा निमार्ता आणि अध्यक्ष मार्क झुकरबर्ग यांच्या सुरक्षेसाठी हा खर्च आला आहे. गेल्या दोन वर्षांत झुकरबर्गच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली.
त्यामुळेच त्याचा खर्चही कोट्यवधी रुपयांनी वाढला आहे. अर्थात हा सगळा खर्च फेसबुक कंपनीच करत असल्याचे सांगण्यात आले आहे.गेल्या वर्षी फेसबुकने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षेवर १५० कोटी रुपये खर्च केले होते.
फेसबुकवर डेटा चोरीचा तसेच निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर मार्क झुकरबर्गच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. याबाबत कंपनीकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, आमच्या कंपनीचा कारभार पारदर्शक आहे.
त्यामुळेच कंपनीच्या संचालकांनी झुकरबर्ग यांना असलेला धोका अतिशय गांभीयार्ने घेतला आहे. त्यामुळेच त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आणि त्यात कोणत्याही प्रकारची कसर राहणार नाही, याचीही दक्षता घेण्यात आली आहे.
झुकरबर्गच्या सुरक्षेसाठी होणाºया खर्चात वाढ होण्याचे कारण म्हणे कोरोनाच्या साधीमुळे प्रवासाचा प्रोटोकॉल बदलला आहे. त्यामुळे अधिकची सुरक्षा द्यावी लागते. तसेच अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढविण्यात आली होती.
फेसबुकच्या म्हणण्यानुसार झुकरबर्गचे कंपनीमध्ये एकमेवद्वितिय स्थान आहे. त्यांच्याबाबत कोणतीही नकारात्मक बातमी ही कंपनीवर परिणाम करू शकते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी खर्च वाढवावा लागला आहे.
झुकरबर्ग यांना येणाºया धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा खर्च वाढवा लागला आहे. विशेष म्हणजे ते वर्षाला केवळ १ डॉलर पगार घेतात. कोणत्याही प्रकारचे बोनस आणि इतर लाभ घेत नाहीत.
वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App