सिक्युरिटी गार्ड ते आयआयएमचा प्रोफेसर, केरळमधील रंजित रामचंद्रनचा प्रवास


मोडकळीस आलेली झोपडी, आई-वडीलांसह बहिण भावंडाना सांभाळण्यासाठी केवळ चार हजार रुपयांवर सिक्युरिटी गार्डची नोकरी करत असतानाही शिक्षणाची जिद्द सोडली नाही. त्यामुळेच केरळमधील रंजित रामचंद्रन हा केरळमधील २८ र्वांचा तरुण आयआयएम रांचीमध्ये प्रोफेसर झाला आहे.Ranjit Ramachandran’s journey from Security Guard to IIM Professor, Kerala


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : मोडकळीस आलेली झोपडी, आई-वडीलांसह बहिण भावंडाना सांभाळण्यासाठी केवळ चार हजार रुपयांवर सिक्युरिटी गार्डची नोकरी करत असतानाही शिक्षणाची जिद्द सोडली नाही. त्यामुळेच केरळमधील रंजित रामचंद्रन हा केरळमधील २८ र्वांचा तरुण आयआयएम रांचीमध्ये प्रोफेसर झाला आहे.

रंजितचा हा प्रवास युवकांसाठी प्रेरणादायी आहे. केरळमधील कसारगोड जिल्ह्यातील रंजित कुटुंबातील थोरला. वडीलांचा टेलरचा व्यवसाय. आई रोजगार हमीवर मजूर. परंतु, कुटुंबाचा त्यामध्ये उदरनिर्वाह होणे कठीण.त्यामुळे वडीलांना मदत म्हणून रंजितने चार हजार रुपये पगारावर सिक्युरिटी गार्डची नोकरी करू लागला. पण त्याने अभ्यासाकडे दूर्लक्ष केले नाही. दिवसा कॉलेजला जाऊन रात्री बीएसएनएलच्या कार्यालयात सिक्युरिटी गार्ड करत होता.

घरी फक्त दुपारच्या जेवणासाठी जायचा.. अनेक वेळा परिस्थिती इतकी बिघडली की शिक्षण सोडून द्यावे असे वाटायचे. हे करतच रंजितने इकॉनॉक्समध्ये पीएचडी पूर्ण केली. पीएचडीसाठी नोंदणी करेपर्यंत रंजितला इंग्रजी येत नव्हते. पण त्यावरही त्याने मात केली.

ैआयआयएम रांचीचे नियुक्तीपत्र आल्यावर रंजितने सोशल मीडियावर आपल्या झोपडीचे फोटो शेअर केले. त्याने लिहिले आहे की आयआयएमचा असिस्टंट प्रोफेसर याच घरात जन्मला आहे.
रंजित म्हणतो, मी हे ऐवढ्यासाठीच लिहिले आहे की युवकांना प्रेरणा मिळावी.

माझे यश अनेकांच्या स्वप्नांना बळ देईल. बारावी झाल्यावर एका क्षणी मला वाटले होते की शिक्षण सोडून द्यावे आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी एखादी छोटीसी नोकरी करावी. रंजित हा मराठी भाषा बोलणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीतील आहे. परंतु, त्याला शिक्षणासाठी कधीही आरक्षणाची गरज पडली नाही.

रंजित म्हणतो, कॉलेजच्या पाच वर्षांच्या काळात मी टेलीफोन एक्सेंजमध्येच राहिलो. सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करताना माझ्याकडे एक्सेंमधील वीज जाणार नाही हे पाहणे मुख्य काम होते.

Ranjit Ramachandran’s journey from Security Guard to IIM Professor, Kerala

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*