स्वतः नरसिंहराव पुन्हा आले तरी 1991 चा प्रार्थनास्थळ कायदा बदलतील!!; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचे प्रतिपादन


नाशिक : 1991 चा प्रार्थना स्थळ कायदा ही प्रतिक्रियात्मक भीतीपोटी उचललेले पाऊल होते. तो आता बदलता येईल. त्यात फार काही अवघड नाही. स्वतः नरसिंह राव जरी परत आले तरी ते स्वतःच तो कायदा बदलतील, असे प्रतिपादन अयोध्येतील राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी केले आहे. Even if Narasimha Rao himself returns, the 1991 place of worship will change

ज्ञानवापी मशिदीच्या वादात आणि मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी – शाही ईदगाह वादात मुस्लिम पक्षाने 1991 च्या प्रार्थना स्थळ कायदाच आपल्या कोर्टातील युक्तिवादात प्रमुख मानला आहे. या पार्श्वभूमीवर स्वामी गोविंददेव गिरी यांनी या कायद्याबाबत भूमिका मांडली.

स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, की राम जन्मभूमी – बाबरी मशीद वादाच्या वेळी आपण काहीतरी केले हे दाखविण्यासाठी 1991 चा कायदा नरसिंह राव यांनी आणला. त्यामागे समाजाच्या उद्रेक होण्याची भीती होती. पण आता काळ बदलला आहे. तशी परिस्थिती उरलेली नाही. शिवाय हा कायदा राज्यघटनेच्या मूळ भाग नाही. त्यामुळे तो बदलणे अवघड नाही.

अर्थात राम जन्मभूमी न्यासाची तशी मागणी नाही. ज्ञानवापी मशिदीचा वाद आणि मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी – शाही ईदगाह वाद सांमजस्याने सोडवावेत, हीच आमची भूमिका असल्याचे स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी स्पष्ट केले.

स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले :

  •  तिस्ता सेटलवाड टार्गेटेड व्हायोलन्स कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता. यातून हिंदू समाजाची हानी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
  •  राष्ट्रीय समाजाच्या मुसक्या आवळल्या होत्या. पण आता समाजात बदल झाला आहे. म्हणून काशी विश्वनाथ, मथुरा हे विषय पुढे आले आहेत.
  •  काशी सत्य बाहेर येईल. न्यायालय ते ठरवेल. न्याय झाला पाहिजे. तिथे शिवलिंग आहे.
  •  काश्मीर मधील छोटे प्रश्न देखील मिटतील.
  •  भोंगा – अजान म्हणजे हाक… ही प्रार्थना नव्हे… ती संयत रूपात हवी. आक्रमकता नको. शांतता पाहिजे.
  •  सुशिक्षित मुस्लीम समाजाला शांतता हवी आहे. पण मुस्लिमांचे काही नेते समाजाला भडकवत आहेत. डिवचत आहेत.
  •  1991 भीतीपोटी कायदा स्वतः नरसिंह राव पुन्हा आले तरी तेच तो कायदा बदलतील. तो मूळात घटनेचा भाग नाही. 370 कलम रद्द तर 1991 चा कायदा काय चीज आहे?? तो कायदाही बदलणे नक्की शक्य आहे.

Even if Narasimha Rao himself returns, the 1991 place of worship will change

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात