अयोध्या दौरा राज ठाकरेंचा : तो गाजविण्याचे “अघोषित कॉन्ट्रॅक्ट” भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांच्याकडे!!


महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या सभा गाजविण्याचे “अघोषित कॉन्ट्रॅक्ट” जसे शिवसेनेने, भाजपने, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने घेतले आहे… तसेच “अघोषित कॉन्ट्रॅक्ट” भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी घेतले आहे. Warrior tour of Raj Thackeray: BJP MP Brajbhushan Singh announces unannounced contract

राज ठाकरे योध्येच्या दौर्‍याबद्दल गेल्या काही दिवसांमध्ये चकार शब्दही बोललेले नाहीत. उलट काल पुण्यात अक्षरधारा बुक स्टॉलला भेट देताना तेथे त्यांना पत्रकारांनी गाठले, तेव्हा आम्हाला जगू देता की नाही?? असे विचारून त्यांनी पत्रकारांना झटकले होते. राज ठाकरे यांची सभा पुण्यात होणार आहे. ती नेहमीप्रमाणे नदीकाठावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांच्या नाराजीच्या बातम्या प्रसारमाध्यमे जास्तच ठळकपणे देत आहेत.पण राज ठाकरे या कुठल्याही मुद्द्यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत. भोंग्यांचा विषय देखील त्यांनी बऱ्याच दिवसात पुन्हा काढलेला नाही. पण त्यांच्या आयोध्या दौऱ्याचे कॉन्ट्रॅक्ट अघोषितपणे घेतल्यासारखे ब्रजभूषण सिंह रोज पत्रकार परिषद घेऊन किंवा बाईट देऊन गाजवत आहेत.

भाजपने अशी स्वतःची कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. त्यांना तशी घेण्याचे कारणही नाही. पण राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करून ब्रजभूषण सिंह महाराष्ट्रव्यापी आणि उत्तर प्रदेश व्यापी प्रसिद्धी मात्र भरपूर मिळवत आहेत हेच या निमित्ताने फक्त सिद्ध होते!!

तसेही राज ठाकरे यांना अयोध्या दौरा करताना कोणाला अडविता ही येणार नाही. तो त्यांच्या मूलभूत अधिकार यावरचा घाला ठरेल. हे ब्रजभूषण सिंह यांच्यासारख्या कसलेल्या आणि 4 वेळा खासदार राहिलेल्या नेत्याला माहिती नसेल असे नाही. पण राज ठाकरे यांच्या निमित्ताने आपली प्रसिद्धी होते आहे ना… मग करून घ्यायला काय हरकत आहे!!, असा जर विचार ते करत असते तर त्यांनाही कोण अडवणार??, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा होईपर्यंत “अघोषित कॉन्ट्रॅक्ट” घेतल्यासारखे ब्रजभूषण सिंह हे त्यांचा दौरा गाजवत राहणार आणि स्वतःला भरपूर प्रसिद्धी मिळवत राहणार हे मात्र निश्चित!!

Warrior tour of Raj Thackeray: BJP MP Brajbhushan Singh announces unannounced contract

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात