राज्यसभा निवडणूक : सहावी जागा लढविणार शिवसेना; पण घोडेबाजाराचा आरोप भाजपवर!!; फाऊल संभाजीराजेंना!!


प्रतिनिधी

मुंबई : राज्यसभेची सहावी जागा लढवणार शिवसेना…. पण घोडेबाजाराचा आरोप भाजपवर… आणि फाऊल संभाजीराजांना अशी राजकीय परिस्थिती आता महाराष्ट्रात उद्भवताना दिसत आहे!! Shiv Sena to contest for sixth seat; But BJP is accused of horse-trading

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळीच ट्विट करून शिवसेनेचा मनसूबा जाहीर केला आहे. वास्तविक राज्यसभा निवडणुकीतील मतांचा कोटा पाहता महाविकास आघाडी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी एकच उमेदवार निवडून येणे शक्य आहेत. संभाजीराजे यांनी “अपक्ष” म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे राष्ट्रवादीची ज्यादा मध्ये त्यांना देण्याचे शरद पवार यांनी जाहीर केले आहे. ते एक प्रकारे राष्ट्रवादी पुरस्कृतच उमेदवार झाले आहेत. परंतु, आता संजय राऊत यांनी ट्विट करत शिवसेनेचा उमेदवार मैदानात उतरणार असल्याचा मनसूबा जाहीर केला आहे.

त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून “अपक्ष” उमेदवार संभाजीराजे यांची कोंडी करत आहेत का?? असा प्रश्न यानिमित्ताने तयार झाला आहे… की शरद पवारांनी संभाजीराजे यांना राष्ट्रवादीची जादा मध्ये परस्पर जाहीर केल्यामुळे शिवसेनेने त्यांच्या प्रयत्नांना खो घातला आहे??, असाही सवाल तयार होत आहे!!

संभाजीराजे यांनी सर्व अपक्षांना तसेच सर्वपक्षीय आमदारांना उद्देशून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाला राज्यसभेसाठी पक्षविरहित उमेदवार म्हणून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसे सविस्तर पत्र त्यांनी सर्व आमदारांना पाठवले आहे.

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी अद्याप आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. तरीही संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये भाजपवर शरसंधान साधले आहे. विरोधी पक्षाची महत्त्वाकांक्षा जागृत झाले आहे. त्यामुळे घोडेबाजाराला ऊत येईल पण शिवसेना राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी आपला उमेदवार मैदानात उतरवेल. शिवसेनेकडे आकडे आणि मोड दोन्ही आहे… हम लढेंखे और जीतेंगे, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

आकडेमोडीच्या हिशेबात शिवसेनेची एकच जागा निवडून येणे शक्य असताना आणखी एक जागा लढवून प्रत्यक्षात तोच पक्ष घोडेबाजाराला चिथावणी देत असताना संजय राऊत यांनी मात्र घोडेबाजाराचा चिथावणी चा आरोपाचा बाण विरोधी पक्ष भाजप वर सोडला आहे!!

Shiv Sena to contest for sixth seat; But BJP is accused of horse-trading

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात