नवरे आंदोलनात गेल्यावरही पंजाबमधील महिलांनी कष्टाने पिकवले सोने, आजपर्यंतचे सगळे विक्रम मोडले


ऐन हंगामात पंजाबधील पुरुष कृषि कायद्यांविरोधातील आंदोलनात दिल्लीला गेले होते. मात्र, या काळात पंजाबमधील महिलांनी आपल्या कष्टाने सोने पिकविले. नवरे आंदोलनात गेल्यावरही त्यांनी काळ्या माईची सेवा सोडली नाही.Even after her husband joined the agitation, the women of Punjab worked hard to earn gold, breaking all records till date


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : ऐन हंगामात पंजाबधील पुरुष कृषि कायद्यांविरोधातील आंदोलनात दिल्लीला गेले होते. मात्र, या काळात पंजाबमधील महिलांनी आपल्या कष्टाने सोने पिकविले. नवरे आंदोलनात गेल्यावरही त्यांनी काळ्या माईची सेवा सोडली नाही.

कोरोना संसर्गाच्या उद्रेकाच्या दरम्यानच गेल्या सहा महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाबचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. पण त्यांच्या पत्नी आणि मुला-मुलींनी शेतात फावडे, कुदळ मारण्याबरोबरच ट्रॅक्टरही चालवला.



पेरण्या, खत, फवारणीपासून ते कापणीदेखील स्वत:च केली. त्याचा परिणाम म्हणजे या वर्षी राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारी संस्थांना गहू विक्री करण्याचा आतापर्यंतचा विक्रम मोडला आहे.

कृषी विभागाचे सहसंचालक गुरविंदरसिंग म्हणाले, १३ मेपर्यंत १३२ लाख १६ हजार १८७ मेट्रिक टन गव्हाच्या पिकाची मंडईत विक्री झाली. इतकेच नाही तर शेतकऱ्यांनी २६ हजार कोटी रुपये कमावले असून ते मागील हंगामाच्या तुलनेत १४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत.

विशेष म्हणजे पंजाब सरकारने १० एप्रिल ते १३ मे या ३४ दिवसांमध्ये १३० लाख मेट्रिक टन गहू खरेदीचे लक्ष्य ठेवले होते.या वेळी हवामान खराब होते. उष्णता, वादळ, पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकरी गव्हाला पाणी देण्यास असमर्थ होते.

तरीही गव्हाच्या खरेदीत पंजाबने सर्वाधिक विक्रम नोंदवला. मागील हंगामात १७७ मे.टन उत्पादन झाले होते. या वेळी १७१ लाख मेट्रिक टन झाला.
गव्हाच्या पेरणीच्या वेळी राज्यातील सुमारे १६.५ लाख शेतकरी कुटुंबातील निम्मे सदस्य दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते.

त्यामुळे त्यांच्या पत्नींनी आणि मुलांनी गव्हाच्या पेरण्या केल्या.पेरणीच्या वेळी लॉकडाऊन असल्याने बाहेरील राज्यांतून येणाºया मालगाड्या बंद होत्या. त्यामुळे पंजाबमध्ये डॅप आणि युरिया खताचा तुटवडा झाला. अनेक ठिकाणी गव्हाच्या पेरण्यांनाही विलंब झाला.

Even after her husband joined the agitation, the women of Punjab worked hard to earn gold, breaking all records till date

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात