सोनिया गांधींचा धरणे आंदोलनाला पाठिंबा पण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध, कोरोना सुपरस्प्रेडर ठरण्याची व्यक्त केली भीती


देशातील प्रमुख विरोधी पक्षांसह कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही शेतकऱ्यां च्या २६ मे रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र, हे धरणे आंदोलन कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरेल अशी भीती व्यक्त करत पंजाबाचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदसिंग यांनी त्याला विरोध केला आहे. शेतकऱ्यां नी धरणे आंदोलन करू नये असे आवाहन केले आहे.Sonia Gandhi supports farmers agitation but Punjab CM opposes it


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : देशातील प्रमुख विरोधी पक्षांसह कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही शेतकऱ्यां च्या २६ मे रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

मात्र, हे धरणे आंदोलन कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरेल अशी भीती व्यक्त करत पंजाबाचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदसिंग यांनी त्याला विरोध केला आहे. शेतकऱ्यां नी धरणे आंदोलन करू नये असे आवाहन केले आहे.



दिल्लीच्या सीमेवर सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाला २६ मे रोजी सहा महिने पूर्ण होत आहे. यानिमित्ताने २६ मे रोजी देशभर धरणे आंदोलन करण्याचे आवाहन भारतीय किसान संघटनेने केले आहे.

कॉँग्रेससह देशातील १३ प्रमुख विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आहे. मात्र, कॅ. अमरिंदरसिंग यांनी त्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे.कॅ. अमरिंदरसिंग म्हणाले, पंजाबने कोरोविरुध्द लढाई प्राणपणाने लढली आहे.

दिल्ली, महाराष्ट्र आणि गंगेमध्ये वाहत असलेल्या मृतदेहांमुळे भांडे उघड पडलेल्या उत्तर प्रदेशासारखी स्थिती पंजाबची होऊन दिली नाही. भारंतीय किसान संघटनेने पतियाळामध्ये तीन दिवस धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे राज्य सरकारच्या कोरोनाविरुध्दच्या लढाईला फटका बसू शकतो.

महामारीच्या काळात शेतकऱ्यांनी बेजबाबदारपणे वागून लोकांच्या प्राणांशी खेळू नये. राज्यात सामाजिक आणि राजकीय मेळाव्यांवर पूर्ण बंदी आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर जमले तर कायद्याचा भंग होईल.

या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी गावांमधून शेतकरी येण्याची शक्यता आहे. सध्या गावांमध्ये कोरोनाची दुसरी लाट कहर माजवित आहे. त्यामुळे हे शेतकरी एकत्र आले तर कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होण्याची भीती कॅ. अमरिंदरसिंग यांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. केंद्राने नवे कृषि कायदे मागे घ्यावेत यासाठी प्रयत्न करत आहे. पंजाब सरकारनेच पहिल्यांदा नव्या कृषि कायद्यांविरोधात कायदा मंजूर केला. मात्र, आता महामारीच्या काळात आंदोलन करणे योग्य नाही.

Sonia Gandhi supports farmers agitation but Punjab CM opposes it

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात