पंजाबच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न देशातील शेतकऱ्यांपेक्षा सर्वाधिक, तरीही ते रस्त्यावर

  • स्वार्थीसाठी आंदोलनाचा दिखाऊपणा उघड,काहीचे राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कृषी कायद्यातील तरतूदीविरोधात आंदोलन छेडणारे पंजाबमधील शेतकरी हे उत्पन्न घेण्याच्या बाबतीत सर्वाधिक श्रीमंत असल्याचे आढळून आले आहे. ते वार्षिक सरासरी २,१६,७०६ रूपये एवढे उत्पन्न घेतात. ते श्रीमंत असूनही ते आंदोलनासाठी रस्त्यावर आले आहेत. त्या खालोखाल हरियाणाचे शेतकरी सरासरी १,७३,२०८ रूपये एवढे तर जम्मू काश्मीरचे शेतकरी १,५२,१९६ रूपये एवढे वार्षिक उत्पन्न घेतात. punjab farmers earns most than avarrage indian farmer

शेतकरी किती पैसे कमवतात, किती उत्पन्न घेतात, याबाबतची आकडेवारी पुढे आली आहे. भारतीय शेतकरी हे वर्षाला सरासरी ७७,१२४ एवढे वार्षिक उत्पन्न घेतात. तेवढी कमाई त्यांना होते. त्याचे विभाजन केले तर महिनाकाठी ६,४२७ एवढी रक्कम ही मिळते. त्यातून सरासरी महिन्याच्या खर्चासाठी ६,२२३ एवढी तरतूद केलेली असली तरी त्यांना उपजिविकेसाठी ठराविक रक्कम ही हाताशी ठेवता येत असते.

मिळालेल्या आकडेवारीनुसार गरिबीचा, शासनाच्या मदतीचे अवसान आणणारे पंजाबचे शेतकरी हे मूळातच श्रीमंत आहे किंबहुना देशातील इतर राज्यातील शेतकर्यांच्या तुलनेत त्यांना शासनाकडून मिळणारी मदत आणि इतर चांगले वार्षिक उत्पन्न मिळते, पण तरीही या शेतकऱ्यांचा ओरडा सुरूच असतो. गेल्या १५ दिवसांपासून पंजाबकडील शेतकऱ्यांचे सुरू असलेल्या आंदोलनामुळे रस्ते वाहतूक ठप्प होण्याबरोबरच जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे.दिल्ली, पंजाब, हरियाणा त्या लगतच्या प्रांतातील परिस्थितीत बिघडवण्यास हेच शेतकरी कारणीभूत ठरत असून नव्या आकडेवारीनुसार या आंदोलनातील अनेक शेतकरी चांगलेच श्रीमंत आहे, वास्ताविक त्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षाही नाही मात्र उगीगच राजकीय पुढाऱ्यांच्या,पक्षांच्या सांगण्यावरून ते सरकारविरोधात आपली गरळ ओकतांना दिसतात. मात्र आता त्यांचे सत्यच माध्यमांतून मांडले जाऊ लागल्याने त्याची एकप्रकारे पोलखोलच होत आहे.

गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान मागेच

दिल्लीतील पंजाबच्या शेतकर्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ रस्त्यावर सारेच शेतकरी उतरले. अर्थात त्यांना स्थानिक शेतकरी संघटना,राजकीय पक्षाची फुस मिळाली. त्यामुळेच ते त्यांच्यात सहभागी झाले. पण ही आकडेवारी पाहता, गुजरात (९५,११२) सहाव्या, महाराष्ट्र (८८,६२०) सातव्या तर राजस्थान (८८,१८८) आठव्या स्थानी असल्याचे दिसते. या राज्याच्या तुलनेत केरळ (१,४२,६६८), कर्नाटक (१.०६,९८४) या राज्यातील शेतकऱ्यांचा उत्पन्नाच्या बाबतीत क्रमांक लागतो. राष्ट्रीय एकूण उत्पन्न ७७.,१२४ एवढे आहे. त्यावर तमीळनाडू आणि आसाम या राज्यांनी राजस्थाननंतरचा क्रमांक मिळवला आहे.

punjab farmers earns most than avarrage indian farmer

उद्योगधंदे आणि नियोजनाच्या बाबतीत आघाडीवर असलेले मध्यप्रदेश (७४,५०८) , आंध्र प्रदेश (७३,३९२), छत्तीसगड (६२,१२४), ओरिसा (५९,७१२) आहेत. सर्वांत मोठे राज्य म्हणून समजले जाणारे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना अवघ्या ५८,९९४ एवढे उत्पन्न घेता येते तर झारखंड(५६,८५२),पश्चिम बंगाल(४७,७६०) आणि बिहार (४२,६८४) येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न तुलनेने खूपच कमी असल्याचे दिसते. या उपलब्ध आकडेवारीतून पंजाबचे शेतकरी हे देशात सर्वात श्रीमंत म्हणून ओळखले जातात आणि अशा श्रीमंत शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर यावे लागते, हे आश्चर्यच म्हणता येईल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*