परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास, कोरोनाच्या संकटातही भारतात विक्रमी परकीय गुंतवणूक, गुजरातची महाराष्ट्रावर मात


देशातील तथाकथित अर्थतज्ज्ञच अर्थव्यवस्थेतील मंदीवरून कोल्हेकुई सुरू असताना परकीय गुंतवणूकदारांनी मात्र भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दर्शविला आहे. कोरोनाच्या महामारीतही देशात विक्रमी गुंतवणूक केली आहे. गुजरातने परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रावर मात केली आहे. गुजरातमध्ये ३७ टक्के तर महाराष्ट्रात २७ टक्के गुंतवणूक झाली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील एकूण ७८ टक्के गुंतवणूक आकर्षित करून गुजरातने मोठी भरारी घेतली आहे.Confidence of foreign investors, record foreign investment in India even in the Corona crisis, Gujarat beats Maharashtra


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशातील तथाकथि अर्थतज्ज्ञच अर्थव्यवस्थेतील मंदीवरून कोल्हेकुई सुरू असताना परकीय गुंतवणूकदारांनी मात्र भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दर्शविला आहे. कोरोनाच्या महामारीतही देशात विक्रमी गुंतवणूक केली आहे.

गुजरातने परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रावर मात केली आहे. गुजरातमध्ये ३७ टक्के तर महाराष्ट्रात २७ टक्के गुंतवणूक झाली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील एकूण ७८ टक्के गुंतवणूक आकर्षित करून गुजरातने मोठी भरारी घेतली आहे.



गेल्या वर्षीपासून संपूर्ण देश कोरोना संकटाशी लढत आहे. गेल्या वर्षात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला. मात्र, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.

त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर विश्वास ठेवणाºया गुंतवणूकदारांनी लॉकडाऊनमध्ये भारतात गुंतवणुकीचा धडाका कायम ठेवला आहे.गुजरातमध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. गुजरातमध्ये ३७ टक्के तर महाराष्ट्राला २७ टक्के गुंतवणूक झाली आहे.

कर्नाटकात १३ टक्के गुंतवणूक आली आहे. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रशतील गुंतवणुकीत गुजरातने महाराष्ट्र आणि कर्नाटकालाही मागे टाकले आहे. या क्षेत्रात गुजरातमध्ये तब्बल ७८ टक्के गुंतवणूक झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत टक्केवारीत सौदी अरेबियाने सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. याशिवाय अमेरिका, ब्रिटन यांनीही मोठी गुंतवणूक केली आहे. अमेरिकेची गुंतवणूक २२७ टक्के तर ब्रिटनमधून आलेली गुंतवणूक ४४ टक्के वाढली आहे.

वाणिज्य मंत्रालयाने थेट परकीय गुंतवणुकीसंदर्भात आकडेवारी जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारतात परकीय गुंतवणूक १९ टक्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षात भारतात एकूण ५९.६४ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली आहे,

अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग विभागाकडून देण्यात आली आहे. थेट परकीय गुंतवणुकीमधील एकूण गुंतवणूक १० टक्यांनी वाढली आहे. ही गुंतवणूक विक्रमी पातळीवर गेली असून, २०२०-२१ मध्ये एफडीआय ८१.७२ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.

तर इक्विटीमध्ये थेट परकीय गुंतवणूक १९ टक्यांनी वाढली आहे. २०१९-२० मध्ये ४९.९८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली होती. २०२०-२१ मध्ये त्यात १९ टक्के वाढ झाली आणि एकूण ५९.६४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली.

भारतात परकीय गुंतवणुकीचा सर्वाधिक ओघ सिंगापूरमधून आला आहे. गेल्या आर्थिक वषार्तील एकूण गुंतवणुकीत सिंगापूरचा २९ टक्के वाटा आहे. त्यानंतर अमेरिका २३ टक्के आणि मॉरिशसमधून ९ टक्के गुंतवणूक झाली आहे.

परकीय गुंतवणूक धोरणातील सुधारणा, व्यवसाय सुलभता आणि विविध उपाययोजना यामुळे परकीय गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास कायम असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. जागतिक पातळीवर बड्या गुंतवणूकदारांच्या पसंतीमध्ये भारत हा आघाडीचा देश ठरला आहे.

गेल्या वर्षभरात सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे ४४ टक्के, पायाभूत सेवा क्षेत्रात १३ टक्के आणि सेवा क्षेत्रात ८ टक्के गुंतवणूक असून, एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी गुजरातेत ३७ टक्के, महाराष्ट्रात २७ टक्के आणि कर्नाटकात १३ टक्के गुंतवणूक झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Confidence of foreign investors, record foreign investment in India even in the Corona crisis, Gujarat beats Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात