Congress “Toolkit” Case : दिल्ली पोलिसांची मोठी कार्रवाई ; दिल्ली तसेच गुरगावच्या ट्विटर कार्यालयावर छापेमारी


टूलकीटप्रकरणी ट्विटरने घेतलेल्या भूमिकेवरून केंद्र सरकारने ट्विटरला कडक शब्दांत सूचना दिल्या होत्या. सरकारने ट्विटरला म्हटले होते की, ट्विटरने मॅनिप्युलेटेड मीडियाचा टॅग काढून टाकावे . कारण अद्याप टूलकिट प्रकरणाची चौकशी सुरू आहे. केंद्रीय आयटी मंत्रालयाने  देखील स्पष्ट केले होते की, एजन्सची टूलकीटच्या कंटेंटची चौकशी करत आहे, ट्विटरची नाही.Congress “Toolkit” Case: Delhi Police Carries Out Search operation At Twitter India Offices


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: संकटाचा राजकारणासाठी कसा फायदा घ्यायचा हे नमूद केलेले कॉंग्रेसचे टूलकीट लीक झाले आणि प्रचंड गदारोळ सुरू झाला .यानंतर ट्विटरने भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्या काही ट्विटवर मॅनिप्युलेटेड मीडियाचा टॅग लावला .यावर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने ट्विटरला मॅनिप्युलेटेड मिडिया प्रकरणात नोटीस पाठवली आहे. दिल्ली पोलिसांनी ट्विटरला विचारले आहे की, त्यांच्याजवळ अशी कोणती माहिती आहे ज्याच्या आधारे ते संबित पात्रा  यांच्या ट्विटला मॉनिप्युलिटेड म्हणत आहेत. दिल्ली पोलिसांनी अशा प्रकारची नोटीस ट्विटरला  पाठवले होते. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आता ही कारवाई केली आहे.Congress “Toolkit” Case: Delhi Police Carries Out Search operation At Twitter India Offices

https://twitter.com/rohanduaTOI/status/1396767517679374343?s=20

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात ट्विटरलाही माहिती शेअर करण्यासाठी सांगितले आहे. तसेच ट्विटरने मॅनिप्युलेटेड मिडिया हा टॅग का वापरला याचेही स्पष्टीकरण देण्याचे नोटीशीत म्हटले आहे.  सोमवारी सायंकाळी दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलची टीम ट्विटर इंडियाच्या कार्यालयात दाखल झाली. दिल्लीत तसेच गुरगावच्या ट्विटरच्या कार्यालयात ही छापेमारी टीमकडून करण्यात आली असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

या प्रकरणात दिल्ली पोलीसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या एखा विशेष पथकाने मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर  कार्यालयावर छापा मारला आहे. दिल्ली पोलिसांचे एक विशेष पथक ट्विटर इंडियाच्या  दिल्ली येथील लाडो सराय आणि हरियाणामधील गुरुग्राम परिसरातील कार्यालयात पोहोचले. दिल्ली पोलिसांनी  कारवाई २४ मे रोजी सायंकाळी केली. दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाला या आधीच नोटीस पाठवली होती.

त्यानंतर आता कार्यालयावर छापाही टाकला आहे.

टूलकिट प्रकरणात ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टखाली मॅनिप्यूलेटेड मीडिया असे लिहिल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांच्या विशेष विभागाने ट्विटरला नोटीस पाठवून उत्तर मागितले होते. प्राप्त माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी ट्विटरला विचारले आहे की, त्यांच्याजवळ अशी कोणती माहिती आहे ज्याच्या आधारे ते संबित पात्रा (Sambit Patra) यांच्या ट्विटला मॉनिप्युलिटेड म्हणत आहेत. दिल्ली पोलिसांनी अशा प्रकारची नोटीस ट्विटरला सोमवारी (17 मे) पाठवले होते. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आता ही कारवाई केली आहे.

दिल्ली पोलिसांचे पीआरओ चिन्मय विस्वाल यांनी म्हटले आहे की, टूलकिट प्रकरणात ट्विटरजवळ अशी कोणतीह माहिती आहे जी दिल्ली पोलिसांना माहिती नाही. ही माहिती या प्रकरणाच्या तपासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांनी ट्विटरच्या कार्यालयाची तपासणी केली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात तक्ररदार आणि तक्रारीच्या आशयाबाबत माहिती दिली नाही.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांना एका विशेष पथकाने लाडोसराय येथील कार्यालय बंद मिळाले. ज्यानंतर पोलिसांचे हे विशेष पथक परत आले. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, विशेष पथकाचा आणखी एक गट ट्विटरच्या गुरुग्राम येथील कार्यालयावरही पोहोचली. दिल्ली पोलिस टूलकीट प्रकरणात ट्विटरच्या भूमिकेचा तपास करत आहेत.

Congress “Toolkit” Case: Delhi Police Carries Out Search operation At Twitter India Offices

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात