भारत की सिरिया? : दिल्लीच्या जामा मशिदीत एकट्या मुलीला अथवा मुलींच्या गटाला प्रवेश बंदी; परिवाराबरोबरच येण्याची सक्ती; सोशल मीडियात संताप


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीच्या जामा मशिदीत एकट्या मुलीला अथवा फक्त मुलींच्या गटाला प्रवेश करायला मशीद प्रशासनाने बंदी घातली आहे. महिला आणि मुली आपल्या परिवाराबरोबरच मशिदीत येऊ शकतात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, या प्रवेश बंदीच्या मुद्द्यावर सोशल मीडियात प्रचंड संताप उसळला असून जामा मशिदीच्या प्रशासनाने भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात महिला आणि मुलींवर तालिबाने कायदे लादणे चालवले आहे, असा आरोप अनेकांनी केला आहे. Entry ban for single girl or group of girls in Delhi’s Jama Masjid



सोशल मीडियावरचा हा संताप पाहून दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी जामा मशीद प्रशासनाला नोटीस पाठवण्याची घोषणा आपल्या ट्विटर हँडल वरून केली आहे. जामा मशिदीत मुली आणि महिलांना प्रवेश बंदी करण्याचा फैसला पूर्णपणे चुकीचा आहे. मशिदीत इबादत करण्याचा अधिकार जेवढा पुरुषांना आहे, तेवढाच महिलांना देखील आहे. जामा मशिदीच्या इमामांना आपण नोटीस जारी करत असून त्यांच्याकडून खुलासा मागवत असल्याचे स्वाती मालिवाल यांनी ट्विट मध्ये स्पष्ट केले आहे.

मात्र, जामा मशिदीचे प्रवक्ते सबीउल्लाह यांनी मशीद प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन केले असून जामा मशिदीत एकटी मुलगी अथवा फक्त मुली आल्या तर काही गैरप्रकार झाल्यास आढळले आहे. त्यामुळे एकटी मुलगी अथवा फक्त मुलींनाच प्रवेश करू देण्यावर बंदी घातली आहे. महिला आणि मुली आपल्या परिवाराबरोबर केव्हाही येऊन मशिदीत इबादत करू शकतात, असा खुलासा केला आहे.

सोशल मीडियात मात्र जामा मशिदीत मुलींना प्रवेश बंदी घालण्याच्या निर्णयावर प्रचंड संताप उसळला असून अनेकांनी या निर्णयाचे वर्णन तालिबानी कायदा लादण्याचा प्रकार या शब्दात केले आहे, तर हा सर्वांना समान अधिकार देणारा धर्मनिरपेक्ष भारत आहे. कट्टरतावादी सीरिया नव्हे, असे अनेकांनी जामा मशीद प्रशासनाला सुनावले आहे.

 

Entry ban for single girl or group of girls in Delhi’s Jama Masjid

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात