दिल्लीतील जामा मशिदीच्या दुरूस्तीसाठी शाही इमामांचे पंतप्रधान मोदींना साकडे


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – राजधानीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने जामा मशिदीच्या दक्षिण मीनारचे नुकसान झाले आहे. काही भाग कोसळला आहे. त्याच्या दुरूस्तीसाठी केंद्र सरकारने आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला सांगावे, असे साकडे जामा मशिदीच्या शाही इमामांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घातले आहे. vDelhi: Portion of Jama Masjid minaret damaged in Friday’s storm, shahi imam writes to PM for reconstruction by ASI

जामा मशिदीच्या दुरूस्तीसंदर्भात शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी पंतप्रधान मोदींना सविस्तर पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी जामा मशिदीच्या नुकसानीची तपशीलवार माहिती दिली आहे.

जामा मशिदीच्या कारभाराची आणि देखभालीची सूत्रे दिल्ली वक्फ बोर्डाकडे आहेत. मात्र, मशिदीची दुरूस्ती आर्किऑलजिकल सर्वे ऑफ इंडियाने करावी, अशी अपेक्षा शाही इमामांनी व्यक्त केली आहे. १९५६ मध्ये आर्किऑलजिकल सर्वे ऑफ इंडियाने एकदा मशिदीची दुरूस्ती केली होती, याचा हवाला शाही इमामांनी पत्रात दिला आहे. दक्षिण मीनारचे जे दगड कोसळले आहेत, ते एक ते दोन मीटर लांबीचे आहेत. गेल्या वर्षी भूकंपाच्या झटक्यात एक छोटा मीनार कोसळला होता. तो देखील दुरूस्त करायचा आहे. मशीद १६५६ मध्ये शहाजहाँनने बांधली आहे. त्यावेळी बांधकामात वापरलेल्या लोखंडी सळ्या देखील गंजल्या आहेत. अनेक स्तंभांना आणि भिंतीना धोका आहे. ही सगळी दुरूस्ती आर्किऑलॉजिकल सर्वेने करावी, अशी अपेक्षा शाही इमामांनी व्यक्त केली आहे.

मशिदीचे व्यवस्थापन आणि देखभाल दिल्ली वक्फ बोर्डकडे आहे. अशा स्थितीत त्याची दुरूस्ती करण्याची जबाबदारी देखील वक्फ बोर्डाची आहे. मात्र, १९५६ मध्ये एकदा त्यावेळच्या सरकारने आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडून काही दुरूस्ती करवून घेतली होती. याचा हवाला शाही इमाम आणि काही इतिहासतज्ञ देताना दिसत आहेत.

Delhi: Portion of Jama Masjid minaret damaged in Friday’s storm, shahi imam writes to PM for reconstruction by ASI

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात