काश्मीरमध्ये पंपूर मधल्या शिव मंदिराचा होणार जीर्णोद्धार; अतिक्रमण हटवण्याचे महापौर याकूब मलिकांचे निर्देश


वृत्तसंस्था

पंपूर : जम्मू काश्मीरच्या केशराची राजधानी पंपूर मधल्या पुरातन शिवमंदिराचा आता जीर्णोद्धार होणार आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमणही हटणार आहे. पंपूरचे महापौर आणि भाजपचे वरिष्ठ नेते याकूब मलिक यांनी या शिवमंदिराला प्रत्यक्ष भेट देऊन तिथली पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही निर्देशही दिले. In Kashmir, the restoration of the Shiva temple in Pampur will be done

या पुरातन मंदिराच्या जमिनीत संदर्भात सगळे पुरावे घेऊन तिची व्यवस्थित आखणी करा. तिथे असलेले अतिक्रमण हटवा आणि लवकरात लवकर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा आराखडा बनवून काम सुरू करा, असे निर्देश याकूब मलिक यांनी दिले आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत अधिकारी आणि नगरसेवक होते.

जम्मू-काश्मीर मधले 370 कलम हटवल्यानंतर त्या केंद्रशासित प्रदेशात स्थानिक पंचायत निवडणुका मोकळ्या वातावरणात पार पडल्या. स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधींच्या हाती आले. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनी आपापल्या पद्धतीने काम सुरू केले आहे. पंपूर मध्ये भाजपची सत्ता आहे. तेथे याकूब मलिक हे थेट जनतेतून निवडून आले आहेत. त्यांनी अनेक प्रशासकीय सुधारणा सुरू केल्या आहेत. यापैकी जम्मू-काश्मीरच्या पुरातन वारसा असलेले शिवमंदिर आणि परिसराचा जीर्णोद्धार करण्याचे काम लवकरच सुरू करणार आहेत..

In Kashmir, the restoration of the Shiva temple in Pampur will be done

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण