ठाकरे – आंबेडकर – पवार एकत्र येण्याच्या नुसत्याच चर्चा, पण दलित पॅंथरचा एकनाथ शिंदेंना खुला पाठिंबा


प्रतिनिधी

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे वेब पोर्टलच्या लोकार्पण कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले आणि त्यांच्या आघाडीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. Dalit Panther’s open support to Eknath Shinde

त्यामध्ये अजित पवारांनी देखील प्रकाश आंबेडकर यांची चर्चा करण्याची तयारी दाखवून संभाव्य आघाडीत राष्ट्रवादीची एन्ट्री केली. पण ही आघाडी मूळातच अजून चर्चेच्याच पातळीवर असताना दलित पॅंथरने मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा देऊन टाकला आहे. दलित पॅंथरच्या कराड मधल्या अधिवेशनात बाळासाहेबांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर करू, असे दलित पॅंथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांचे आतेभाऊ सुखदेव सोनवणे यांनी जाहीर केले आहे.

राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना वगळून बाकी सर्व पक्षांनी आपापल्या मूलभूत राजकीय भूमिकांशी विसंगत भूमिका घेऊन भाजप आणि एकनाथ शिंदे यांना टक्कर देण्याची तयारी चालवली आहे.

 उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा यू टर्न

यातला सर्वात मोठा यू टर्न उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ज्या पक्षांशी बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा उभा दावा होता, त्या सर्व पक्षांची उद्धव ठाकरे जुळवून घेत आहेत. यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबरोबरच प्रकाश आंबेडकरांचे समावेश आहे, इतकेच नाही तर ज्या भैय्या लोकांना बाळासाहेबांनी ठाम विरोध केला आणि मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेचे अख्खे राजकारण पुढे खेचले, तो मुद्दा आता बासनात गुंडाळून आदित्य ठाकरे हे बिहारमध्ये जाऊन तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांची देखील भेट घेते झाले आहेत.


Eknath Shinde Revolt : बंड टाळता आले नसते का? परिस्थितीला एकटे शिंदेच जबाबदार नाहीत…


पण हे सर्व असले तरी अजून सर्व विरोधकांची आघाडी प्रत्यक्षात अस्तित्वात यायची आहे. असे असताना दलित पॅंथरने मात्र जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या संभाव्य आघाडीलाच काटशह दिला आहे.

शिवाय प्रकाश आंबेडकरांशी आघाडीबाबत चर्चा करण्याची तयारी अजित पवारांनी दाखवली असली तरी प्रकाश आंबेडकरांनी या आधीच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेस नको, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच फक्त उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या दोनच पक्षांना आघाडीची ऑफर दिली होती. त्यामध्ये जाहीरपणे सांगून त्यांनी राष्ट्रवादीला वगळले होते. पण आता अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करण्याची तयारी दाखवल्यानंतर अद्याप तरी आंबेडकरांची प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकत्र आघाडी होणार का? आणि त्यामध्ये काँग्रेस सामील होणार की त्यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे काँग्रेस स्वतंत्र लढणार?, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

 दलित राजकारणातही नवा ट्विस्ट

पण या घडामोडींमध्ये मात्र दलित पॅंथरने आपला पत्ता उघड करून थेट एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेऊन दलित राजकारणाच्या दृष्टीने देखील महाराष्ट्रात नवा ट्विस्ट आणला आहे.

Dalit Panther’s open support to Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण