पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला असताना निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना पुढील २४ तासांसाठी निवडणूक प्रचारावर बंदी घातली आहे. सोमवार रात्रौ ८ वाजल्यापासून ही बंदी लागू होणार आहे.Election Commission slams Mamata Banerjee in the run-up to the by-elections, banning her from campaigning for 24 hours
विशेष प्रतिनिधी
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला असताना निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना पुढील २४ तासांसाठी निवडणूक प्रचारावर बंदी घातली आहे. सोमवार रात्रौ ८ वाजल्यापासून ही बंदी लागू होणार आहे.
ममता बॅनर्जी यांनी एका प्रचार रॅलीदरम्यान हिंदू आणि मुस्लिम समाजावर वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. आदर्श आचारसंहितेचे पालन न केल्यामुळे याची दखल घेत निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना पुढील २४ तासांकरिता निवडणूक प्रचारासाठी बंदी घातली आहे.
निवडणूक आयोगाने तत्काळ प्रभावापासून बंदी लागू असल्याचे म्हटले आहे. सोमवार, १२ एप्रिल रात्रौ ८ वाजल्यापासून ते १३ एप्रिल रात्रौ ८ वाजेपर्यंत ही बंदी असेल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
याचाच अर्थ पुढील २४ तास ममता बॅनर्जी कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचारात सहभागी होऊ शकणार नाही. यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, तृणमूल खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी यावर निषेध नोंदवला आहे.
एक ट्विट करत या निर्णयाविरोधात निषेध नोंदवला असून, १२ एप्रिल… लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. निवडणूक आयोग म्हणजे मोदी कोड ऑफ कंटक्ट असल्याची टीका ममतांनी केली होती.
वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App