ममता बॅनर्जी यांचा कांगावा सुरूच, भाजपाला आपल्याला घरातच ठेवायचे असल्यानेच केला हल्ला

पश्चिम बंगालमधील पोलीस आणि मुख्य सचिवांनीही ममता बॅनर्जींवर नंदीग्राममध्ये हल्ला झाला नव्हता तर तो अपघात होता असा निर्वाळा दिला आहे. मात्र, तरीही ममतांचा कांगावा सुरूच आहे. निवडणूक काळात आपल्याला घरातच बांधून ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हल्ला केल्याचा आरोप ममतांनी केला आहे. Mamata Banerjee’s call continued, the BJP attacked because it wanted to keep her at home


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील पोलीस आणि मुख्य सचिवांनीही ममता बॅनर्जींवर नंदीग्राममध्ये हल्ला झाला नव्हता तर तो अपघात होता असा निर्वाळा दिला आहे. मात्र, तरीही ममतांचा कांगावा सुरूच आहे. निवडणूक काळात आपल्याला घरातच बांधून ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हल्ला केल्याचा आरोप ममतांनी केला आहे.

गोपीबल्लभपूर येथे एका सभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, यापूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून आपल्यावर शारीरिक हल्ले होत होते. आता तेच काम भारतीय जनता पक्षाने केला आहे. आपल्यावर हल्ला करून घरातच राहण्यास बाध्य करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.त्यामुळेच त्यांनी माझ्यावर हल्ला केला. माझा पाय दुखावला गेला आहे. मात्र, ते माझा आवाज दाबून ठेऊन शकत नाहीत. आम्ही भारतीय जनता पक्षाचा निश्चित पराभव करणार आहेत.

ममता म्हणाल्या, तृणमूल कॉँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला दिलेले मत हे वैयक्तिक मला दिलेले असेल. झारग्राम लोकसभेची जागा २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने जिंकली असली तरी या भागाच्या विकासासाठी त्यांनी काहीही केलेले नाही. आपले सरकार आल्यावर नागरिकांना रेशन घरपोच मिळेल.

Mamata Banerjee’s call continued, the BJP attacked because it wanted to keep her at home

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*