Drugs Case : राणा दग्गुबती आणि रकुल प्रीतसह १० जणांना पाठवले समन्स ! जाणून घ्या कधी होणार चौकशी?


२००७ मध्ये तेलंगणा उत्पादन शुल्क आणि निषेध विभागाने ३० लाख किमतीची ड्रग्स केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ११ प्रकरणांमध्ये ड्रग तस्करांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. Drugs Case: Summons sent to 10 people including Rana Daggubati and Rahul Preet!  Know when the inquiry will take place?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ड्रग्ज बाबतीत बऱ्याच काळापासून तपास चालू आहे आणि या प्रकरणात सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली आहे. काहींना अटकही करण्यात आली आहे. अद्यापही तपास चालू आहे. याचसंबंधी आता रकुल प्रीत सिंह आणि राणा दग्गुबतीसह १० जण चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

 या लोकांना पाठवले समन्स

चार वर्षांच्या ड्रग्ज प्रकरणात सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली आहे.आता एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ईडीने रकुल प्रीत सिंहला ६ सप्टेंबरला, राणा दग्गुबतीला ८ सप्टेंबरला आणि रवी तेजाला ९ सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच ज्यांना समन्स पाठवण्यात आले आहे, त्यांची नावे या प्रकरणात आरोपी म्हणून नाहीत, पण त्यांना फक्त चौकशीसाठी बोलावले जात आहे.



असे आहे संपूर्ण प्रकरण

२००७ मध्ये तेलंगणमध्ये ३० लाख किमतीची ड्रग्ज जप्त करण्यात आली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ११ प्रकरणांमध्ये ड्रग्ज तस्करांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

नंतर ईडीने तक्रारीवर आधारित या प्रकरणाचा तपास मनी लाँडरिंगच्या अँगलने सुरू केला होता. या प्रकरणात तेलंगणातून ३० जणांना अटक झाली असून ६२ जणांची चौकशी करण्यात आली आहे. यात ११ जण चित्रपट उद्योगाशी संबंधित आहेत.

Drugs Case: Summons sent to 10 people including Rana Daggubati and Rahul Preet!  Know when the inquiry will take place?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात