Drugs Case : अभिनेते दलिप ताहील यांचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी अटकेत, व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन ध्रुव ताहिलला अटक


ध्रुव ताहील एका ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होता. तो पेडलरकडून वारंवार ड्रग्जची मागणी करत होता.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रख्यात अभिनेते दलिप ताहील यांच्या मुलगा ध्रुव याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून ध्रुव ताहील याला बेड्या ठोकण्यात आल्या. ध्रुव ड्रग पेडलरकडे व्हॉट्सअ‍ॅपवरुन वारंवार अंमली पदार्थांची मागणी करत होता. Drugs Case : Actor Dalip Tahils Son Dhruv Tahil arrested by NCB in drugs caseध्रुव ताहील एका ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होता. तो पेडलरकडून वारंवार ड्रग्जची मागणी करत होता. ड्रग्जसाठी ध्रुवने त्याला पैसे दिल्याचंही उघड झालं आहे. दोघांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ध्रुव ताहील याला अटक केली.

एनडीपीएस कायद्याअंतर्गत ध्रुवला अटक झाली असून त्याला वांद्रे क्राईम ब्रांचमध्ये ठेवण्यात आले होते. आज त्याला कोर्टात हजर केले जाईल.

व्हॉट्सअ‍ॅप वर मागणी

35 ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणात अँटी नार्कोटिक्स सेलकडून 20 एप्रिलला मुजमिल अब्दुल रहमान शेख याला अटक करण्यात आली होती. त्याचा मोबाईल अंमली पदार्थ विरोधी विभागाने ताब्यात घेतला. तेव्हा त्याच्या व्हॉट्सअॅपवर ध्रुव ताहील याच्यासोबतचे संभाषण समोर आले. ध्रुव मुजमिलकडे वारंवार ड्रग्जची मागणी करत होता.

ध्रुवने ड्रग्जसाठी आरोपी मुजमिलच्या बँक खात्यात सहा वेळा ऑनलाईन पैसेही ट्रान्सफर केले होते, असं तपासात स्पष्ट झालं. मार्च 2019 पासून दोघं संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ध्रुव ताहील याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Drugs Case : Actor Dalip Tahils Son Dhruv Tahil arrested by NCB in drugs case

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात