द्रौपदी मुर्मू : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आदिवासी महिला राष्ट्रपतीपदी; 5.77 लाख मतांनी विजय; यशवंत सिन्हांना केवळ 2.61 लाख मते


  •  17 खासदार, 104 आमदारांचे क्रॉस वोटिंग

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात इतिहास घडला आहे. देशाचे सर्वोच्च पद अर्थात राष्ट्रपतीपदी प्रथमच द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने आदिवासी महिला विराजमान होणार आहे. केंद्रातील सत्ताधारी NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू देशाच्या 15 व्या राष्ट्रपती होतील. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होतील. गुरूवारी सकाळी 11 वा. सुरू झालेल्या मतमोजणीत मुर्मूंनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा तिसऱ्या फेरीत पराभव केला. मुर्मू यांनी तिसर्‍याच फेरीत विजयासाठी आवश्यक इलेक्टोरल मतांपैकी 50 % मते मिळवली. 17 खासदार आणि 104 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची माहिती आहे. Draupadi Murmu Tribal Woman President in Jubilee Year of Independence

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी हंडा यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

मुर्मूंना खासदारांची 540, सिन्हांना 208 मते

राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांच्या माहितीनुसार, दुपारी 2 वा. खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण झाली. त्यात द्रौपदी मुर्मू यांना 540 मते मिळाली. त्याचे एकूण मूल्य 3 लाख 78 हजार आहे. याऊलट यशवंत सिन्हा यांना 208 खासदारांची मते पडली. त्याचे मूल्य 1 लाख 45 हजार 600 एवढे आहे. 15 मते बाद झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, 17 खासदारांनी आणि 104 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली आहे. अर्थात राष्ट्रपती निवडणुकीत पक्षाचा व्हीप नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता नाही.

10 राज्यांच्या मतमोजणीतही मुर्मू आघाडीवर

पहिल्या 10 राज्यांतील मतमोजणीतही मुर्मू व सिन्हा यांच्या मतांच्या आकड्यात मोठे अंतर होते. या राज्यांमध्ये एकूण 1138 वैध मते होती, ज्यांचे मूल्य 1 लाख 49 हजार 575 आहे. त्यापैकी मुर्मू यांना 1 लाख 50 हजार 940 मूल्याची 809 मते मिळाली. तर यशवंत सिन्हा यांना 44 हजार 276 मूल्याची 329 मते मिळाली.

या 10 राज्यांमध्ये आंध्र प्रदेशासह अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश व झारखंडच्या मतांचा समावेश आहे. यापैकी 7 राज्यांमध्ये भाजप व युतीची सरकारे आहेत. तर झारखंड व छत्तीसगडमध्ये काँग्रेस व तिच्या मित्रपक्षांची सरकारे आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी यापूर्वीच मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता.

द्रौपदी यांच्या विजयातून राजकीय संदेश

द्रौपदी मुर्मूंच्या विजयाची घोषणा होताच देशभरात आधीच सुरू असलेल्या जल्लोषात भर पडली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात द्रौपदीमुळे यांच्या रूपाने आदिवासी महिलेला सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी देऊन भाजपने समाजामध्ये व्यापक संदेश दिला आहे समाजातील मुख्य प्रवाहापासून बाजूला असलेल्या समाजातील व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच देशाच्या सर्वोच्च स्थानी बसवण्याची किमया यातून साधली आहे.

त्यामुळेच विजयानंतर पोस्टरमध्ये द्रौपदी मुर्मूंसोबत इतर कोणत्याही नेत्याचा फोटो लावू नये, अशा सक्त सूचना पक्ष कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपासून पक्षाने 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

यामुळे मुर्मू यांचा विजय निश्चित

भाजपने 21 जून रोजी मुर्मू यांना उमेदवारी दिली होती, तेव्हा एनडीएच्या खात्यात 5 लाख 63 हजार 825 म्हणजेच 52 टक्के मते होती. 24 विरोधी पक्षांसोबत असल्याने 4 लाख 80 हजार 748 म्हणजेच 44% मते सिन्हा यांच्याकडे विचारात घेतली जात होती. गेल्या 27 दिवसांत अनेक गैर-एनडीए पक्ष समर्थनार्थ आल्याने मुर्मू यांना निर्णायक आघाडी मिळाली. जर सर्व 10 लाख 86 हजार 431 मते पडली तर मुर्मू यांना 6.67 लाख (61%) पेक्षा जास्त मते मिळतील. सिन्हा यांची मते 4.19 लाख इतकी कमी झाली. विजयासाठी 5 लाख 40 हजार 065 मतांची गरज होती.

25 रोजी शपथविधी

21 जुलै रोजी मतमोजणी झाल्यानंतर देशाच्या नव्या राष्ट्रपतींची घोषणा केली जाईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैच्या मध्यरात्री संपत आहे. 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपतींचा शपथविधी होणार आहे.

Draupadi Murmu Tribal Woman President in Jubilee Year of Independence

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात