प्रतिनिधी
मुंबई /नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी विक्रमी मतांनी निवडणूक जिंकली आहे. या निवडणुकीत विरोधी आघाडीच्या तब्बल 17 खासदारांनी आणि 104 आमदारांनी क्रॉस वोटिंग केले आहे. यामध्ये 16 आमदार महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. Draupadi Murmu President Cross Voting of 17 MPs 104 MLAs
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यांना महाराष्ट्रातल्या सध्याचा विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट मतदान करणे अपेक्षित होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा जाहीर केल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या 16 आमदारांनी द्रौपदी मुर्मू यांनाच मतदान केले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सर्वच्या सर्व आमदारांनी यशवंत सिन्हा यांना मतदान केले नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या तब्बल 16 आमदारांनी क्रॉस वोटिंग करत यशवंत सिन्हा यांच्या ऐवजी द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले आहे.
एकनाथ शिंदेंचे आश्वासन खरे ठरले
शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी 164 आमदारांनी सरकारच्या बाजूने तर 99 आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना 200 आमदारांची मते मिळवून देऊ, असे जाहीर आश्वासन विधानसभेत दिले होते. क्रॉस वोटिंग झालेला आकडा पाहता शिंदे यांचे म्हणणे जवळपास खरे झालेली दिसून येत आहे.
पवारांना दोन धक्के
तर शरद पवारांनी यशवंत सिन्हा यांच्या बाजूने लावलेली फिल्डिंग फोल ठरली आहे. आजच पवारांचे नंबर दोन प्रफुल्ल पटेल यांची यांचे मुंबईतले राहते चार मजली घर ईडीने जप्त केले आहे आणि राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसला क्रॉस वोटिंगचा फटकाही बसला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App