वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) गुरुवारी नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींची सव्वा २ तास चौकशी केली. त्यांना दुसऱ्या टप्प्यातील चौकशीसाठी २५ जुलै रोजी पुन्हा बोलावले आहे. नुकतेच कोरोनातून बरे झाल्यानंतर सोनिया गांधी ईडी मुख्यालयात दुपारी १२.०० वाजता पोहोचल्या. साडेबारा वाजता चौकशी सुरू झाली.National Herald Money Laundering Case ED questions Sonia for 2-and-a-half hours, resumes on July 25
सोनियांनी २७ ते २८ प्रश्नांची उत्तरे दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या विनंतीनुसार चौकशी लवकर संपवण्यात आली. काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश म्हणाले, सोनिया गांधी यांनी अस्वस्थता आणि विनंती केल्यामुळे चौकशी संपवल्याचे वृत्त निराधार आहे. ईडीकडे आणखी प्रश्नच नव्हते. सोनिया गांधी रात्री ८-९ वाजेपर्यंत चौकशीस तयार होत्या. सोनियांना सांगण्यात आले की, त्यांना २६ जुलै रोजी बोलावण्याचे समन्स द्यायचे होते, आता त्यांच्या सांगण्यावरून एक दिवस आधी समन्स देत आहोत.
राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरावर ईडीची टाच
राष्ट्रवादी काँग्रसचे सरचिटणीस व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या वरळीतील सीजे हाऊसमधील चौथ्या मजल्यावरील घरावर गुरुवारी ‘ईडी’ने (सक्तवसुली संचालनालय) टाच आणली. इक्बाल मिरची प्रकरणी ही कारवाई झाली आहे. यासंबंधित पटेलांची चौकशीही झाली होती. वरळीतील सीजे हाऊसमधील दुसऱ्या मजल्यावर आधीच ईडीने कारवाई केली होती. गुरुवारी दुपारी ईडीचे अधिकारी येथे आले होते. त्यांनी चौथा मजला सील केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App