जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर अटी लादण्याचा प्रयत्न करू नका, केंद्र सरकारने ट्विटरला फटकारले


ट्वीटर जगातील सर्वा त मोठ्या लोकशाहीवर आपल्या अटी लादण्याचा प्रयत्नन करत आहे. जाणून बुजून सरकारच्या आदेशाचे पालन न करून कायद्या सुव्यवस्था दुबळी करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडिया कंपन्यांचे प्रतिनिधी भारतात सुरक्षित होते आणि पुढेही राहतील, असे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.Don’t try to impose conditions on the world’s largest democracy, the central government slammed Twitter


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: ट्वीटर जगातील सर्वा त मोठ्या लोकशाहीवर आपल्या अटी लादण्याचा प्रयत्नन करत आहे. जाणून बुजून सरकारच्या आदेशाचे पालन न करून कायद्या सुव्यवस्था दुबळी करण्याचा प्रयत्न करत आहे.

सोशल मीडिया कंपन्यांचे प्रतिनिधी भारतात सुरक्षित होते आणि पुढेही राहतील, असे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त करणाºया ट्वीटरला उत्तर देताना माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की, ट्वीटरचे अलिकडील उत्तर हे ट्विटरचे अलीकडील विधान हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर आपल्या अटी लादण्याचा एक प्रयत्न आहे.

कंपनी नियमांचे पालन करण्यास नकार देत आहे. यामुळे गुन्ह्यांच्या जबाबदारीपासून त्यांना सुरक्षा मिळते आहे. कंपनी आदेशाचे पालन न करता मुद्दाम भारताच्या कायदा व सुव्यवस्थेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

भारतात ट्वीटरचे मोठ्या संख्येत युजर आहेत. पण ट्विटर इंडियाचे अधिकारी म्हणतात, आपल्याला कोणतेही हक्क नाहीत. कोणत्याही प्रकारचा मुद्दा उपस्थित केल्यावर

ते अमेरिकेतील ट्विटर मुख्यालयाशी संपर्क साधण्यास सांगतात. कंपनीची युजरबद्दलची कथित वचनबद्धता खोटी असून फक्त आपल्या फायद्यासाठी विचार करत आहे, असं मंत्रालयाने म्हटले आहे.

Don’t try to impose conditions on the world’s largest democracy, the central government slammed Twitter

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण