वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अमेरिकेची प्रसिद्ध औषध निर्माता कंपनी फायझरने त्यांची ‘पी फायझर’ कोरोना लस १२ वर्षांवरील मुलांसाठीही उपयोगी ठरल्याचं म्हटलंय.फायझरने या लसीला परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे . फायझरने दावा केला आहे की, त्यांची लस भारतात पसरलेल्या करोना व्हायरस विरूद्ध प्रभावी आहे. दरम्यान कंपनीने लस साठवण्याबाबतही चर्चा केली. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान भारताला ५ कोटी डोस देण्यास फायझर तयार आहे. फायझर फार्मा कंपनी देशात फास्ट ट्रॅक मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.Reassuring: Vaccination for everyone over 12 in India soon; Pfizer requested ‘fast track’ permission to the center
भारतात आढळलेलं कोरोना विषाणूचं नवं रुप देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. भारतात आढळलेल्या या म्युटंटविरुद्ध लढण्यासाठी पी फायझर ही लस ‘अतिशय प्रभावशाली’ ठरत असल्याचा दावा कंपनीनं केलाय.
पी फायझर लस १२ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरतेय. तसंच ही लशीचा आठ डिग्री सेल्शिअस तापमानापर्यंत कोल्ड स्टोअरेज सुविधेत एका महिन्यापर्यंत सुरक्षितरित्या साठा करता येणं शक्य असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
भारतीय केंद्र सरकारकडे या लशीच्या वापरासाठी फास्ट ट्रॅक मंजुरी देण्याची मागणी अमेरिकेच्या या दिग्गज कंपनीनं केलीय. प्रतिकूल घटना घडल्यास नुकसान भरपाई किंवा नुकसान भरपाईच्या दाव्यांपासून संरक्षणाची सूट दिली तर जुलै ते ऑक्टोबर या काळात पाच कोटी डोस पुरवण्याचं आश्वासनही कंपनीकडून देण्यात आलंय.
उल्लेखनीय म्हणजे, देशात सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुतनिक व्ही या लशींचा वापर केला जात आहे. परंतु, कोणत्याही लशीला ‘पी फायझर’ने मागितलेल्याप्रमाणे सूट देण्यात आलेली नाही.
अलीकडे आढळलेल्या डेटा पॉइंट्स SARS-CoV-2 विरुद्ध भारतात BNT612b2 चे दोन डोस प्रभावशाली राहतील. तांत्रिकदृष्ट्या, फायझरची लस BNT612b2 म्हणून ओळखली जाते. कंपनीने म्हटले आहे की, लशीचे परीणाम जाणून घेण्यासाठी पब्लिक हेल्थ इंग्लंडने नुकताच एक अभ्यास केला. या अभ्यासात २६ टक्के ‘भारतीय किंवा ब्रिटिश भारतीय’ होते. त्यानंतर BNT612b2 लस प्रभावी असल्याचे २२ मे रोजी पूर्ण झालेल्या अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे.
सोबतच, वेगवेगळ्या देशांनी आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलेले या लशीच्या परीक्षण आणि अनुमोदनाचे आकडेही कंपनीकडून एका बैठकीत सादर करण्यात आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App