विशेष प्रतिनिधी
वर्धा: राज्यासह देशावर कोरोनाचं संकट असताना त्यात म्युकर मायकोसिसची भर पडली. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे .म्युकर मायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगसच्या रुग्णसंख्येमध्ये भर पडत असताना त्याच्यावर मिळणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण होतोय. अशा वेळी वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सने ब्लॅक फंगसवरील उपयोगी Amphotericin B Emulsion या इंजेक्शनचे उत्पादन सुरु केलं असून सोमवारपासून त्याचं वितरण करणार असल्याचं स्पष्ट केलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नानंतर या कंपनीला या उत्पादनाची परवानगी मिळाली होती.Troubleshooter! Gadkari’s birthday ‘gift’ to the country; Genetic Life Science-Wardha’s drug production on black fungus
सोमवार से इस इंजेक्शन का वितरण शुरु होगा और इसकी कीमत 1200 रुपये होगी। अभी यह इंजेक्शन 7000 रुपये तक मिल रहा है। — Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) May 27, 2021
सोमवार से इस इंजेक्शन का वितरण शुरु होगा और इसकी कीमत 1200 रुपये होगी। अभी यह इंजेक्शन 7000 रुपये तक मिल रहा है।
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) May 27, 2021
सध्याच्या घडीला देशातील केवळ एकच कंपनी Amphotericin B Emulsion इंजेक्शनची निर्मिती करत होती. त्यानंतर आता जेनेटेक लाईफ सायन्सेस ही या इंजेक्शनची निर्मिती करणारी दुसरी कंपनी ठरली आहे.
यामुळे इंजेक्शनची टंचाई दूर होईल आणि रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव होणार नाही. सध्या बाजारात Amphotericin B Emulsion इंजेक्शनची कमतरता आहे.
एका इंजेक्शनसाठी ७ हजार रुपये मोजावे लागतात. मात्र जेनेटेक लाईफ सायन्सेसनं तयार केलेल्या इंजेक्शनची किंमत १२०० रुपये असणार आहे. सोमवारपासून इंजेक्शनचं वितरण सुरू होईल.
गडकरींचा आज ६४ वा वाढदिवस आहे. त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. योगायोगानं आजचं त्यांच्या कार्यालयाकडून जेनेटेक लाईफ सायन्सेसकडून तयार करण्यात आलेल्या इंजेक्शनची निर्मितीची माहिती देण्यात आली. या कंपनीला इंजेक्शनचं उत्पादन करता यावं यासाठी गडकरींनी पुढाकार घेतला होता.
ही कंपनी १५ दिवसांत उत्पादन सुरू करेल, अशी माहिती गडकरींच्या कार्यालयाकडून १४ मे रोजी देण्यात आली होती. त्यानंतर १३ दिवसांत कंपनीनं उत्पादन सुरू केलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App