हिंदीप्रमाणेच तमिळलाही केंद्राने अधिकृत भाषेचा दर्जा द्यावा, स्टॅलिन यांनी दिली भाषिक वादाला फोडणी

विशेष प्रतिनिधी

चेन्नई : केंद्र सरकारने हिंदीप्रमाणेच अधिकृत भाषा म्हणून घटनेच्या आठव्या परिशिष्टातील तमिळसह इतर भाषांचा समावेश करण्याची मागणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी केली आहे. त्यामुळे भाषिक वादाला पुन्हा फोडणी मिळणार आहे.DMK govt. demands for Tamil language

तमिळ व्यतिरिक्त संस्कृत, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांना देशात अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे. घटनेच्या भाषेशी संबंधित ३४३ व्या कलमानुसार हिंदी केंद्र सरकारची अधिकृत भाषा आहे. आठव्या परिशिष्टात हिंदीसह २२ भाषांचा समावेश आहे.केंद्राने तमिळ भाषेला २००४ मध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिला होता.स्टॅलिन ते म्हणाले, की तमिळच्या अधिकाधिक संवर्धनासाठी आपले सरकार काम करेल.

केवळ तमिळच नव्हे घटनेच्या आठव्या परिशिष्टातील सर्वच भाषांना केंद्र सरकारची अधिकृत भाषा म्हणून स्थान मिळावे, यासाठी तमिळनाडू सरकार अथकपणे काम करेल.

DMK govt. demands for Tamil language

महत्त्वाच्या बातम्या